25 February 2021

News Flash

सुशांतच्या आत्महत्येनंतर नेटकरी करण जोहर आणि आलियावर संतापले; जाणून घ्या कारण काय

नेटकरी दोघांनाही चांगलेच सुनावत असल्याचे दिसत आहे

बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येने सर्वांनाच धक्का बसला आहे. त्याने वांद्रे येथील राहत्या घरात १४ जून रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. सुशांतचे करिअर यशाच्या शिखरावर असताना त्याने वयाच्या ३४व्या वर्षी आत्महत्या का केली? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. दरम्यान सोशल मीडियावर बॉलिवूड चित्रपट निर्माता करण जोहर आणि अभिनेत्री आलिया भट्टला चाहते अनेक प्रश्न विचारुन सुनावत असल्याचे दिसत आहे.

सुशांतच्या निधनानंतर करण जोहर आणि आलियाने ट्विट करत श्रद्धांजली वाहिली होती. त्यावर लोकांनी एका जुन्या व्हिडीओची त्यांना आठवण करुन दिली. या व्हिडीओमध्ये करण आणि आलियाने सुशांतवर विनोद केल्याचा आरोप चाहते करताना दिसत आहे.

करणने ट्विट करत त्याला धक्का बसल्याचे म्हटले होते. त्यावर अनेकांनी कमेंट करत त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. काहींनी त्याला ‘नेपोटीझम प्रमोटर’ म्हणत आलियाने आणि त्याने मिळून सुशांतची खिल्ली उडवली होती त्याची आठवण करुन दिली.

करण पाठोपाठ आलिया भट्टच्या ट्विटवर देखील अनेकांनी कमेंट केल्या आहेत. आलियाने सुशांतच्या निधानाने मला धक्काच बसला आहे असे म्हणत त्याला श्रद्धांजली वाहिली होती. तिच्या या ट्विटवर अनेकांनी कमेंट करत अचानक लोकांना सुशांतची काळजी कशी वाटू लागली, अनेकांनी, गॉडफादर नसल्यामुळे त्याला योग्य ती वागणूकही दिली नव्हती असे म्हटले आहे. सध्या सोशल मीडियावर करण आणि आलिया मोठ्या प्रमाणावर ट्रोल केले जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 15, 2020 5:54 pm

Web Title: sushant singh rajput suicide netizens bashed karan johar alia bhatt on social media avb 95
Next Stories
1 सोनी मराठी देत आहे ‘लाफ्टर स्टार’ होण्याची संधी!
2 तुला अजून खूप पुढे जायचे होते… सुशांतच्या आत्महत्येवर अभिनेत्याचे ट्विट
3 “ही आत्महत्या नाही, हत्याच”; सुशांतच्या मृत्यूवरून कंगना भडकली
Just Now!
X