26 February 2021

News Flash

Video : “उसी को देखकर जीते है..”; सुशांतने अंकिताबद्दलचं प्रेम केलं होतं व्यक्त

पाहा तो नेमकं काय म्हणाला होता?

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर त्याचे अनेक जुने फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले. त्यातच त्याच्या एका जुन्या मुलाखतीचा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरतोय. या मुलाखतीत सुशांतने अभिनेत्री व ‘पवित्र रिश्ता’ मालिकेतील सहकलाकार अंकिता लोखंडेवर असलेलं प्रेम व्यक्त केलं होतं.

“मोहब्बत में नहीं है फर्क जीने और मरने का, उसी को देखकर जीते है जिस काफिर पर दम निकले”, या ओळी म्हणत पुढे सुशांत अंकिताचा उल्लेख करतो. “गेल्या सहा वर्षांत अंकिताने मला खूप धीर दिला. माझ्यासोबत राहण्यासाठी ती नेहमी उत्सुक असते. माझंही तिच्यावर खूप प्रेम आहे आणि मलाही तिच्यासोबत राहायचं आहे. कोणतंही नातं तोडायचं असेल तर आपण क्षणार्धात कारण शोधू शकतो. पण जर ते नातं टिकवायचं असेल तर त्यासाठी खूप प्रयत्न करणं गरजेचं असतं. तिच्याशिवाय मी राहू शकत नाही आणि याच कारणामुळे मी अनेकदा भावूक होतो”, अशा शब्दांत तो भावना व्यक्त करतो.

‘पवित्र रिश्ता’ या मालिकेच्या सेटवर सुशांत आणि अंकिता यांची प्रेमकहाणी सुरू झाली. सहा वर्षे हे दोघं एकत्र होते. मालिकेपासून चित्रपटापर्यंतच्या सुशांतच्या प्रवासात अंकिता त्याच्यासोबत होती. मात्र काही कारणास्तव त्यांचा ब्रेकअप झाला होता. सुशांतच्या आत्महत्येनंतर अंकिताने त्याच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 9, 2020 8:49 pm

Web Title: sushant singh rajput talking about ankita lokhande in this old video ssv 92
Next Stories
1 सल्लू हे नाव कसं पडलं?; सलमानने सांगितला अजब नावामागील गजब किस्सा
2 नीतू कपूर यांच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये दिसला करण जोहर, झाला पुन्हा ट्रोल
3 जर मी अभिनेता बनलो नसतो तर नक्कीच कुकिंगमध्ये करिअर केले असते- धीरज धूपार
Just Now!
X