21 January 2019

News Flash

…म्हणून मुलांनाही झाडू मारायला लावते काजोल

तनुजा यांनी तिला लहानपणीच घर आणि बाथरुमची साफ- सफाई कशी करायची हे सांगितले

काजोल

काजोल बॉलिवूडमधील एक अशी हरहुन्नरी अभिनेत्री आहे जिला तिच्या दिसण्यापेक्षा अभिनयासाठीच अधिक पसंत केले जाते. नुकतीच काजोलची स्वच्छ आदत स्वच्छ भारत या मोहिमेसाठी ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून नियुक्त केले आहे. काजोलला स्वतःला स्वच्छतेची फार आवड आहे. स्टार कीड असूनही काजोल स्वतःच्या घरी अजूनही झाडू मारते. एवढेच नाही तर ती आपल्या मुलांकडूनही घरात झाडू मारुन घेते.

काजोलचे बालपणही प्रकाशझोतातच गेले असले तरी ती कोणत्याच कामाला कमी लेखत नाही. काजोलच्या मते, तिची आई तनुजा यांनी तिला नेहमीच कोणत्याही कामाला कमी न लेखण्याची शिकवण दिली आहे. तनुजा यांनी तिला लहानपणीच घर आणि बाथरुमची साफ- सफाई कशी करायची हे सांगितले होते. त्यामुळेच लहान असताना ती स्वतः झाडूने घर साफ करायची. तनुजा यांच्या मते, जर एखाद वेळेस घरी साफ-सफाई करणारा आला नाही तर त्यामुळे आपलं घर अस्वच्छ राहता कामा नये. आपल्याला या गोष्टीही येणं तितकंच गरजेचं आहे. आईची ही शिकवण काजोल आता आपल्या मुलांनाही देत आहे.

काजोल लवकरच शाहरुख खानसोबत पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. कुछ कुछ होता है या सिनेमातून काजोल, राणी मुखर्जी आणि शाहरुख खान हे त्रिकूट पहिल्यांदा एकत्र दिसले होते. पुन्हा एकदा राणी आणि काजोल शाहरुखसोबत काम करण्यास सज्ज झाले आहेत. नुकताच या दोघींनी शाहरुखच्या झिरो सिनेमासाठी एका दृश्याचे एकत्र चित्रीकरण केले. या दोघी झिरो सिनेमात पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारत असून कतरिना कैफ आणि अनुष्का शर्मा यांच्या यात मुख्य भूमिका आहेत. आनंद एल राय यांचे दिग्दर्शन असलेल्या या सिनेमात शाहरुख बुटक्या माणसाची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. राणी मुखर्जीही मुलीच्या जन्मानंतर पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये हिचकी सिनेमातून पुनरागमन करत आहे. या सिनेमात तिने एका शिक्षिकेची भूमिका साकारली आहे.

First Published on January 13, 2018 1:32 pm

Web Title: swachh bharat initiative advocacy ambassador kajol sweeped the house cleaned the bathroom in her childhood she teach this to her kids also