नवनवीन मालिका आणि त्यांचं दर्जेदार सादरीकरण याच्या माध्यमातून ‘स्टार प्रवाह’ने नेहमीच प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. असाच एक वेगळा विषय असलेली मालिका ‘जिवलगा’ लवकरच स्टार प्रवाहवर सुरु होतेय. या मालिकेच्या निमित्ताने मराठी टेलिव्हिजनच्या जगतात एक महत्वाचं पाऊल उचलण्यात येणार आहे. आघाडीचा सुपरस्टार स्वप्नील जोशी आणि ‘हँडसम हंक’ सिद्धार्थ चांदेकर हे दोघे अनुक्रमे सात आणि नऊ वर्षांनी छोट्या पडद्यावर झळकणार आहेत. त्यांच्यासोबतच हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टी गाजविणारी अभिनेत्री अमृता खानविलकर आणि मधुरा देशपांडे सुद्धा या मालिकेतून प्रेक्षकांसमोर येणार आले.

सुपरस्टार कलाकारांचा भरणा असलेल्या ‘जिवलगा’ ही मालिका एका आगळी-वेगळी प्रेमकथेवर भाष्य करणारी आहे. “जो डोळे बंद केल्यावरही दिसतो, तो जिवलगा…ज्याच्यामुळे आपण आहोत, तो जिवलगा…,”अशा आशयाची ही प्रेमकथा आहे. स्वप्नील जोशी, सिद्धार्थ चांदेकर, अमृता खानविलकर आणि मधुरा देशपांडे यांच्या सशक्त अभिनयाने आणि ग्लॅमरने ही मालिका सजली आहे.
बऱ्याच काळानंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. त्यामुळे सध्या मी या मालिकेच्या चित्रीकरणासाठी प्रचंड उत्सुक आहे. आज मी जे काही आहे ते टीव्हीमुळेच आहे.खूप वर्षांनंतर मी मालिका करतोय. मी आणि स्टार प्रवाहची संपूर्ण टीम ही मालिका आपल्यासमोर आणण्यासाठी उत्साही आहोत. यात विश्वास नावाच्या लेखकाची व्यक्तिरेखा मी साकारतोय. मागून काहीही मिळत नाही ते कमवायला लागतं यावर विश्वास ठेवणारा हा विश्वास आहे, असं स्वप्नी जोशी म्हणाला.

crime
आमदार गीता जैन यांच्या संस्थेतील प्रकार; छायाचित्रे चोरून संचालिकेला ब्लॅकमेल, तिघांवर गुन्हा दाखल
kannada producer Soundarya Jagadish found dead
घरात मृतावस्थेत आढळले प्रसिद्ध चित्रपट निर्माते, काही दिवसांपूर्वी त्यांच्या पबविरोधात दाखल झाला होता गुन्हा
out there screaming book
बुकबातमी: ‘भयप्रेमीं’साठीचा दस्तावेज..
nagpur crime news, suspicion of character nagpur
प्रेमविवाहानंतर पत्नीच्या चारित्र्यावर संशय; पतीने पत्नीला पाजले विष, पोलिसांनी…

या मालिकेची संकल्पना सतीश राजवाडे यांची आहे. डॉ. चंद्रशेखर फणसळकरांच्या गोष्टीपासून प्रेरणा घेतलेली ही मालिका आहे. विद्याधर पाठारे यांनी या मालिकेची निर्मिती केली असून पराग कुलकर्णी यांनी या मालिकेचे लेखन केले आहे. ही मालिका उमेश नामजोशी यांनी दिग्दर्शित केली आहे.

‘जिवलगा’मध्ये नातेसंबंधांचे अनेक पैलू उलगडत गेलेले प्रेक्षकांना पाहायला मिळतील. मानवी स्वभाव आणि त्यात दाखविलेली प्रगल्भता व विचार करण्याची पद्धत यांची एक वेगळी शैली या कथेतून पुढे येणार आहे. बऱ्याचदा आपली नाती समजून घेण्याची आणि त्यांचे मूल्यमापन करण्याची पद्धत चुकते. आपल्या अवतीभवती असलेल्या माणसांबद्दलचे आपले अंदाज चुकतात. याचा गोष्टींवर ही कथा प्रकाश टाकते. प्रेमामध्ये काय ताकद असते, हेसुद्धा या कथेतून अधोरेखित होते. त्यामुळे ही कथा प्रत्येक घरातील प्रेक्षकाला आपलीशी वाटेल.

जिवलगा’ ही एक खिळवून ठेवणारी प्रेमकथा आहे आणि प्रेक्षकांच्याही ती दीर्घकाळ लक्षात राहील. परस्परसंबंधांची ही कथा असून शेवटी जे योग्य त्याच्या बाजूने ती प्रवास करते. भाषिक दूरचित्रवाहिनीवर अशा प्रकारचे भव्यदिव्य पहिल्यांदाच अनुभवायला मिळणार आहे. ‘स्टार प्रवाह’ या माध्यमातून सुपरस्टार कलाकार आणि उत्तम कथा असे एक महत्वपूर्ण पाऊल उचलत आहे. ही एक उत्तम अशी कथा असून त्यात व्यक्तिरेखांची मानवी कड अनुभवायला मिळेल असे स्टार प्रवाहचे कॉन्टेन्ट अँड प्रोग्रामिंग विभागाचे प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले.

ही मलिका कोणत्याही चित्रपटापेक्षा कमी नाही. कोणतंही काम जेव्हा मी पहिल्यांदा करते तेव्हा मी खूप उत्साही असते. याआधी मी कधीच टीव्ही मालिका केलेल्या नाहीत. माझ्यासाठी सर्वात महत्वाचं असतं ते म्हणजे भूमिका. मग वेब सिरीज असोत, मराठी-हिंदी चित्रपट असोत किंवा रिऍलिटी शो. ‘जिवलगा’मधील भूमिका माझ्या आयुष्याचा एक भाग होणार आहे. मी साकारत असलेली काव्या ही आजच्या काळात जगणारी मुलगी आहे. तिच्या आयुष्यात तिला साजेसा असा एक विश्वास नावाचा जोडीदारही आहे. काव्याचं आपल्या पतीसोबत असणारं नातं हे सर्वसामान्य नवरा-बायकोच्या नात्यापेक्षा खूप वेगळं आहे. मला पूर्ण विश्वास आहे की, जितकी मजा मला ही भूमिका साकारताना येतेय तितकीच ती तुम्हाला बघताना येईल,” असं अमृताने सांगितलं.

‘स्टार प्रवाह’ने आपल्या स्थापनेपासूनच दर्जेदार मराठी मालिका आणि कार्यक्रम देण्यावर भर ठेवला आहे. ‘जिवलगा’ ही मालिकाही आपलं वेगळेपण नक्कीच अधोरेखित करेल. या मालिकेत अनेक आघाडीचे, गुणी आणि लोकप्रिय कलाकार आहेत, त्यामुळे या मालिकेबद्दल बरीच उत्सुकता निर्माण झालीय. तेव्हा पाहायला विसरु नका ‘जिवलगा’ ८ एप्रिलपासून सोमवार ते शनिवार रात्री ८.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.