बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत स्वरा चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकताच स्वराने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत तिला लाज नाही असं स्वराने म्हटलं आहे.

स्वरा भास्करने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ती रात्री अंधारात लपून मॅगी खात आहे. या मागच कारण सांगत स्वरा म्हणाली, ‘तिची दोन मुलांच्या आईची भूमिका साकारते आणि आता ती मॅगी खात आहे. यावेळी तिने हे ही कबूल केले आहे की ती मॅगीशिवाय नाईट शिफ्टचे शूट करु शकत नाही. तर निर्मात्यांनी तर तिला पाहिलं नाही ना असे देखील ती यावेळी बोलते.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Swara Bhasker (@reallyswara)

आणखी वाचा : नागा चैतन्य आणि साई पल्लवीच्या ‘लव्ह स्टोरी’ वर समांथा म्हणाली…

हा व्हिडीओ शेअर करत ‘कारण आम्हाला लाज वाटत नाही! रात्रीची शूटिंग, मॅगी आणि मी, आणि हे केल्यामुळे मला काही वाटतं नाही. माझे ट्रेनर आणि न्यूट्रिशनिस्ट किंवा निर्मात्यांना आणि स्टायलिस्टला कोणीही सांगू नका,’ असे कॅप्शन स्वराने दिले आहे.

आणखी वाचा :मुनमुन दत्तानंतर ‘तारक मेहता..’ फेम राजने सोशल मीडियावरुन रिलेशनशिपबद्दल केलं भाष्य

स्वरा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. सोशल मीडियावर स्वरा मोकळेपणाने तिचं मत मांडताना दिसते. स्वरा शेवटची ‘शीर कोरमा’ या चित्रपटात प्रमुख भूमिकेत झळकली होती. याच बरोबर तिने अनेक वेब सीरिजमध्ये आणि शॉर्ट फिल्म्समध्ये काम केले आहे. लवकरच ती ‘जाहां चार यार’ या चित्रपटाचे शूटिंग सुरू करणार आहे.