News Flash

स्वरा भास्करच वजन वाढतय!

अनेकवेळा अभिनेत्यांना चित्रपटातील व्यक्तिरेखेप्रमाणे वजन वाढवताना, पिळदार शरीरयष्टी कमवताना, वेळप्रसंगी वजन कमी करून शिडशिडीत बांधा करताना पाहण्यात आले आहे.

| July 11, 2014 02:20 am

स्वरा भास्कर

अनेकवेळा अभिनेत्यांना चित्रपटातील व्यक्तिरेखेप्रमाणे वजन वाढवताना, पिळदार शरीरयष्टी कमवताना, वेळप्रसंगी वजन कमी करून शिडशिडीत बांधा करताना पाहण्यात आले आहे. आता अभिनेत्री स्वरा भास्करने वजन वाढविण्याचा क्रार्यक्रम हाती घेतला आहे. ‘निल बट्टे सन्नाटा’ या तिच्या आगामी चित्रपटात ती आईची भूमिका साकारत असून, या व्यक्तिरेखेसाठी सध्या ती मनोसोक्त खाऊन वजन वाढवत आहे. ‘रांझना’ चित्रपटापासून चर्चेत आलेली ही अभिनेत्री सध्या दिग्दर्शक अश्विनी अय्यरच्या ‘निल…’ चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. चित्रपटात ती आईची व्यक्तिरेखा साकारत असून, या भूमिकेसाठी ती फारच तरूण दिसत असल्याने चित्रपटकर्त्यांकडून तिला वजन वाढविण्यास सांगण्यात आले. या गोष्टीला दुजोरा देत स्वरा म्हणाली, मी एक खवय्यी आहे. चित्रपटातील माझी भूमिका आव्हानात्मक असल्या कारणाने मला ही संधी सोडायची नव्हती. आग्र्याच्या ज्या हॉटेलमध्ये मी राहात आहे, तेथील शेफ खूप चविष्ट जेवण बनवतात. या उत्तम जेवणाचा मी आस्वाद लुटत आहे. चित्रपटाचे शुटिंग पूर्ण झाल्यानंतर काय, या प्रश्नाचे उत्तर देताना ती म्हणते, मला माहित नाही. कदाचित, नंतर मी डाएटिंग सुरू करीन. या चित्रपटानंतर सुरज बडजात्यांच्या ‘प्रेम रतन धन पायो’च्या चित्रीकरणास सुरुवात करायची आहे. ज्यासाठी मला बारीक दिसणे गरजेचे आहे. ‘निल…’ चित्रपटाचे शुटिंग ज्या दिवशी संपेल त्या दिवसापासूनच मला उपास करावे लागणार, असे वाटत असल्याचे ती म्हणाली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 11, 2014 2:20 am

Web Title: swara bhaskar to gain weight to play mother
Next Stories
1 ‘बिग बॉस ८’मध्ये दिसू शकतात हे चेहरे
2 टि्वटर, फेसबुक वापरणाऱयांना कामधंदा असतो की नाही – सलमानला प्रश्न
3 ऐश्वर्याचा हिरो जॉन!
Just Now!
X