29 September 2020

News Flash

‘हे प्रश्नदेखील नक्की विचार’; स्वरा भास्करने बबिता फोगटला दिली प्रश्नांची यादी

वाचा, नेमकं काय आहे प्रकरण

सोशल मीडियाच्या माध्यमातून तबलिगी जमातीवर थेट निशाणा साधल्यामुळे महिला कुस्तीपटू बबिता फोगट सध्या चर्चेत आली आहे. भारतात करोना दुसऱ्या क्रमांकावर असून पहिल्या क्रमांकावर तबलिगी जमात असल्याचं वक्तव्य तिने केलं होतं. तिच्या या वक्तव्यावर नागरिकांमधून संमिश्र प्रतिक्रिया घेत असून बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करनेही ट्विट करत बबिता फोगटला पाठिंबा दिला आहे. त्यासोबतच काही मुद्दे सांगून याविषयी देखील जाब विचार असा सल्लाही दिला आहे.

“बबिता जी, ही आकडेवारीदेखील पहा! या लाखो जणांच्या करोना चाचणी झाल्या असतील? कृपया यावर तुमचं मत काय आहे ते सांगा आणि तबलिगी जमातच्या कार्यक्रमाला दिल्ली पोलिसांनी परवानगी कशी दिली हा प्रश्नदेखील नक्कीन उपस्थित करा. बाकी मी तर तुमची चाहती आहेच”, असं ट्विट स्वराने केलं आहे.

बबिता फोगटने तबलिगी जमातवर निशाणा साधल्यानंतर सोशल मीडियावर काही हॅशटॅग ट्रेण्ड झाले यात काहींनी बबिताला पाठिंबा दिला होता. तर काहींनी मात्र तिच्यावर टिकास्त्र डागलं होतं.

कोणत्या ट्विटवरुन वाद सुरु आहे 
काही दिवसांपूर्वी बबिता फोगटने एक ट्विट करत तबलिगी जमातवर निशाणा साधला होता. यात तिने म्हटलं होतं की, करोना व्हायरस भारतातील दुसऱ्या क्रमांकाची समस्या आहे. तिच्या या ट्विटवर मोठा वाद झाला आहे. कारण तिने पहिल्या क्रमांकावर तबलिगी जमात असल्याचा उल्लेख ट्विटमध्ये केला आहे. यानंतर तिला ट्रोल केलं जात असून ट्विटरला #SuspendBabitaPhogat, #बबीता_फोगाट हे हॅशटॅग ट्रेंड होत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 18, 2020 9:12 am

Web Title: swara bhasker twitter reactionn on bbabita phogat blames tablighi jamaat for spread coronavirus ssj 93
टॅग Coronavirus
Next Stories
1 तेलुगू सिनेकर्मचाऱ्यांना बिग बींची मदत; दिले इतके कोटी रूपये
2 ‘मोगली’नंतर बच्चे कंपनीसाठी दूरदर्शनवर येतोय ‘छोटा भीम’
3 VIDEO : लॉकडाउनमध्ये राजकुमार राव कापतोय प्रेयसीचे केस
Just Now!
X