News Flash

आर्थिक मदतीचा गाजावाजा करायचा नव्हता; तापसीचं ट्रोलर्सना उत्तर

तापसी ट्रोलर्सवर संतापली, प्रसिद्धी मिळवण्यासाठी मदत करायची नसते

करोना विषाणूशी दोन हात करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील जनतेला मदतीचं आवाहन केलं होतं. त्यांच्या या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सेलिब्रिटींपासून अगदी सर्वसामान्य लोकांपर्यंत अनेक जण आपापल्या आर्थिक क्षमतेनुसार मदत करत आहेत. दरम्यान बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू हिने देखील मदतनिधी देऊ केला आहे.

तापसीने पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी रक्कम देऊ केली आहे. मात्र तिने रकमेचा आकडा जाहीर केलेला नाही. हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत तिने ही माहिती दिली.

या मुलाखतीत ती म्हणाली, “प्रसिद्धी मिळवण्यासाठी नव्हे तर व्यक्तिगत समाधानासाठी ही मदत मी देऊ केली आहे. काही जण केवळ चर्चेत राहण्यासाठी मदतनिधीचे आकडे जाहीर करत आहेत. मात्र तो त्यांचा दृष्टीकोण आहे. मला त्याची गरज वाटत नाही त्यामुळे मदतीचा आकडा मी अद्याप जाहीर केलेला नाही. मदतीचा आकडा जाहीर न केल्यामुळे काही जणांनी मला ट्रोल देखील केले. परंतु आता मला त्याची सवय झाली आहे. समाजाच्या प्रती कर्तव्यांचे मी शांतपणे पालन करत आहे.”

तापसी व्यतिरिक्त गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी २५ लाखांची मदत जाहीर केली. त्याचबरोबर अक्षय कुमार, विकी कौशल, अनुष्का शर्मा, आलिया भट्ट, राजकुमार राव, सारा अली खान, शाहरुख खान, सलमान खान, साजित नाडियाडवाला, शान, अमृता खानविलकर अशा अनेक कलाकारांनी मदतनिधी देऊ केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 11, 2020 1:13 pm

Web Title: taapsee pannu on donating for coronavirus disease relief mppg 94
Next Stories
1 Lockdown : घरात राहून उर्वशीची झाली मंजुलिका; व्हिडीओ पाहून तुम्हीही घाबराल!
2 सलमानने शेअर केला कब्रस्तानचा फोटो; पण का? जाणून घ्या कारण
3 ‘अब तेरा रोना शुरू हो जाएगा’; करोनावर जॉनी लिव्हर यांचं भन्नाट गाणं
Just Now!
X