17 January 2021

News Flash

‘तारक मेहता..’मधील बबीता गेली टप्पूसोबत फिरायला

मुनमुनने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो पोस्ट केले आहेत.

राज अनादकत, मुनमुन दत्ता

छोट्या पडद्यावरील ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय मालिकेतील प्रत्येक भूमिका प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून घेतली. यामधील ‘बबीता’ची भूमिका फार प्रसिद्ध व लोकप्रिय आहे. ही भूमिका साकारणारी अभिनेत्री मुनमुन दत्ता व टप्पूची भूमिका साकारणारा अभिनेता राज अनादकत हे नुकतेच फिरायला गेले. मुनमुनने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो पोस्ट केले आहेत.

व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढून दोघंही एका रेस्टॉरंटमध्ये गेले आहेत. तिथे काय खावं, काय ऑर्डर द्यावी याचा विचार करत असतानाचा दोघांचा हा फोटो आहे. मुनमुनने दिलेल्या कॅप्शनवरून हे कळतंय की दोघंही खवय्ये आहेत. मुनमुन गेल्या कित्येक वर्षांपासून ‘तारक मेहता..’च्या मालिकेत काम करत आहे. तर राजने २०१७ मध्ये मालिकेत एण्ट्री केली. राज या मालिकेत टप्पूची भूमिका साकारत आहे. याआधी भव्य गांधी टप्पूच्या भूमिकेत होता.

शूटिंगदरम्यान मुनमुन व राज यांच्यात चांगलीच मैत्री झाली. हीच मैत्री या फोटोंमध्येही पाहायला मिळत आहे. सध्या ‘तारक मेहता..’ मालिकेत प्रेक्षकांना दयाबेनच्या वापसीची उत्सुकता लागली आहे. दयाबेनची भूमिका साकारणारी दिशा वकानी मालिकेत परत येणार अशी चर्चा होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 26, 2019 3:56 pm

Web Title: taarak mehta ka ooltah chashmah actor munmun dutta hangs out with raj anadkat ssv 92
Next Stories
1 Bigg Boss Marathi 2: हिना-परागमध्ये पुन्हा पडणार वादाची ठिणगी!
2 ‘अर्जुन रेड्डी’ फेम विजय देवरकोंडा या अभिनेत्रीला करतोय डेट?
3 ‘सेक्रेड गेम्स २’ लांबणीवर जाण्यामागचं नेमकं कारण तरी काय?
Just Now!
X