News Flash

तैमूर की इब्राहिम? करीनाचा आवडता मुलगा कोण?; हा फोटो पाहून चाहत्यांना पडला प्रश्न

करिनाने शेअर केला इब्राहिम आणि तैमुरचा फोटो , म्हणाली...

करीना कपूर ही बॉलिवूडमधील एक नामांकित अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. करिना अभिनयासोबतच सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. इन्स्टा पोस्ट, फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून ती कायम आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते. अलिकडेच तिने सैफ अली खानचा मोठा मुलगा इब्राहिम आणि तैमूर यांचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला. हा फोटो सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

अवश्य पाहा – प्रियांकाचा ग्लॅमरस लूक पाहून हृतिक झाला घायाळ; म्हणाला, तू तर…

अवश्य पाहा – “हॅण्डल विथ केअर नाहीतर…”; स्ट्रिपलेस फोटो शेअर करत क्रितीने दिला इशारा

“माझी लाडकी मुलं, वडिलांसोबत” अशा आशयाची कॉमेंट लिहून तिने हा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये इब्राहिम आणि तैमूरसोबतच सैफ अली खान देखील दिसत आहे. या क्यूट फोटोवर काही तासांत हजारो नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. काही नेटकऱ्यांनी तर “तुझा आवडला मुलगा कुठला? तैमुर की इब्राहिम” असे प्रश्न देखील तिला कॉमेंटमध्ये विचारले आहेत. इब्राहिम हा सैफ अली खान व त्याची घटस्फोटित पत्नी अमृता सिंह यांचा मुलगा आहे. इब्राहिम आणि करिना या दोघांमध्ये फारसे चांगले संबंध नाहीत अशी चर्चा होती. या पार्श्वभूमीवर करिनाने पोस्ट केलेला हा फोटो पाहून काही चाहते अवाकही झाले आहेत.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 15, 2020 4:09 pm

Web Title: taimur ali khan ibrahim ali khan saif ali khan kareena kapoor mppg 94
Next Stories
1 सायली, रियासह भूषणचा ‘मनमौजी’ अंदाज
2 ‘क्राइम पेट्रोल’मधून अनुप सोनी बाहेर? ‘ही’ अभिनेत्री करणार सूत्रसंचालन
3 न्यूड फोटोशूटवर मिलिंद सोमणचं प्रत्युत्तर; “देवानं आपल्याला…”
Just Now!
X