News Flash

‘टकाटक’मधील ‘या’ बोल्ड गाण्याने मोडले विक्रम

धमाल कॉमेडी, बोल्ड दृश्य व दुहेरी अर्थांच्या संवादाचा भरणा असलेला चित्रपट

२०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘टकाटक’ या मराठी चित्रपटाने बॉक्स ऑफिस गाजवलं. पोस्टर आणि ट्रेलर यामुळे या चित्रपटाची सुरुवातीपासूनच चर्चा होती. या चित्रपटातील एका गाण्याची देखील चांगलीच चर्चा रंगली होती. टकाटक या चित्रपटात प्रेक्षकांना अभिजित आमकर आणि प्रणाली भालेराव यांच्यावर चित्रित करण्यात आलेलं ‘ये चंद्राला’ हे गाणं पाहायला मिळालं होतं. या गाण्यातील प्रणालीचा हॉट अंदाज आणि तिच्या मादक अदांनी प्रेक्षकांना घायाळ केलं. श्रुती राणे हिने गायलेल्या या गाण्याला युट्युबवर एक कोटीहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

धमाल कॉमेडी, बोल्ड दृश्य व दुहेरी अर्थांच्या संवादाचा भरणा असलेल्या ‘टकाटक’ या चित्रपटाचं दिग्दर्शन मिलिंद कवडे यांनी केलं होतं. यामध्ये प्रथमेश परब मुख्य भूमिकेत आहे. प्रथमेशसोबत रितिका श्रोत्रीचीही भूमिका आहे. त्याचबरोबर अभिनेता अभिजीत आमकर-प्रणाली भालेराव ही जोडीदेखील पाहायला मिळाली.

चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अडल्ट कॉमेडी, हॉट सीन्स, किसिंग सीन्स दाखविण्यात आले होते. ट्रेलरमधील बोल्डपणा या गाण्यातही पाहायला मिळाला होता. पर्पल बुल एन्टरटेनमेंट प्रस्तुत टकाटक ह्या चित्रपटाची निर्मिती अजय ठाकूर, ओम प्रकाश भट, सुजय शंकरवार, रवी बहरी, इंदरजित सिंग, धनंजय मासूम आणि रबिंद्र चौबे यांनी केली होती. या चित्रपटात भारत गणेशपुरे, प्रदीप पटवर्धन, आनंदा कारेकर, उमेश बोलके आदी कलाकारांच्या भूमिका होत्या.

या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती. झी टॉकीज या वाहिनीवर २६ जुलै रोजी दुपारी १२ वाजता आणि संध्याकाळी ६ वाजता ‘टकाटक’ या चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर सादर होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 19, 2020 4:46 pm

Web Title: takatak marathi movie bold song broke records of views ssv 92
Next Stories
1 “‘गँग्स ऑफ वासेपूर’साठी मी माझं पूर्ण मानधन गमावलं”; अनुराग कश्यपचा रिचाला पाठिंबा
2 करोना संकटामुळे रश्मी देसाईचं ‘हे’ स्वप्न राहिलं अपूर्ण
3 ‘गँग्स ऑफ वासेपूर’साठी रिचाला मिळालं होतं केवळ इतकं मानधन
Just Now!
X