09 August 2020

News Flash

‘तान्हाजी’ मराठीत येणार! ‘या’ दिवशी दिसणार पहिली झलक

जाणून घ्या कधी पाहता येणार 'तान्हाजी'चा मराठी ट्रेलर

'तान्हाजी: द अनसंग वॉरियर'

ओम राऊत दिग्दर्शित ‘तान्हाजी : द अनसंग वॉरियर’ या चित्रपटाची गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चा आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता अजय देवगण तान्हाजी मालुसरे यांची भूमिका साकारत आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. हा ट्रेलर पाहिल्यानंतर या चित्रपटाची हिंदीप्रमाणेच मराठीत देखील निर्मिती व्हावी अशी मागणी जोर धरू लागली होती. त्यातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेदेखील हा चित्रपट मराठी डब करण्यासाठी पाठिंबा दिला होता. त्यातच आता हा चित्रपट मराठीतही प्रदर्शित होणार असून लवकरच त्याचा मराठी ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

वाचा : ‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’ मराठीत डब करण्यासाठी मनसेची परवानगी

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विटवर एक पोस्ट करत ‘तान्हाजी’ हा चित्रपट पुढील वर्षी १० जानेवारी २०२० रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं सांगितलं. त्यासोबतच १० डिसेंबर २०१९ रोजी त्याचा ट्रेलर प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे सध्या चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं आहे. या चित्रपटात शरद केळकर (छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत), देवदत्त नागे ( सूर्याजी मालुसरे), शशांक शेंडे (शेलारमामा) या मराठी कलाकारांच्या भूमिका आहेत.

दरम्यान, सध्या ‘पानिपत’ आणि ‘तान्हाजी’ हे दोन मोठे ऐतिहासिक चित्रपट चर्चेत येत आहे. या दोन्ही चित्रपटांमधून मराठ्यांचा इतिहास उलगडला जाणार आहे. त्यामुळे साऱ्यांचं लक्ष या चित्रपटांकडे वेधलं आहे. ‘तान्हाजी’मधून शिवकालीन इतिहासाच्या पानांमधील तानाजी मालुसरे या मावळ्याच्या पराक्रमाची कथा सांगण्यात येणार आहे. यामध्ये अजय देवगण, सैफ अली खान, काजोल यांसोबतच बरेच कलाकार भूमिका साकारत आहेत. तसंच अजय देवगण प्रोडक्शनचा हा थ्रीडी चित्रपट असून त्याचा हा १०० वा चित्रपट आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 6, 2019 10:09 am

Web Title: tanhaji the unsung warrior to dubbed in marathi 10 dec 2019 marathi trailer out ssj 93
Next Stories
1 Video : मानसी नाईक म्हणतेय ‘आना रे….’
2 ‘देव बघतोय, तोच त्यांना शिक्षा करेल’; नेहाचे टीकाकारांना उत्तर
3 संतापजनक : रेल्वे स्थानकावरच अभिनेत्रीला मारहाण
Just Now!
X