News Flash

खुशखबर! तारक मेहतामध्ये होणार दया बेनची एण्ट्री

जाणून घ्या कधी..

गेल्या १२ वर्षांपासून छोट्या पडद्यावरील ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेचे नुकताच ३००० हजार एपिसोड पूर्ण झाले आहेत. या मालिकेतील प्रत्येक पात्राची वेगळी अशी ओळख आहे. आता गेल्या काही दिवासांपासून मालिकेपासून लांब असणारी दया बेनची मालिकेत पुन्हा एण्ट्री होणार असल्याचे समोर आले आहे.

‘आजतक’ने दिलेल्या वृत्तानुसार, एकीकडे येत्या दिवाळीत किंवा दिवाळीच्या आधी दया बेन म्हणजेच अभिनेत्री दिशा वकानी मालिकेत कमबॅक करणार असल्याचे म्हटले जात आहे. दिशा वकानीची मालिकेत पुन्हा एण्ट्री होणार असल्याने चाहते आनंदी झाल्याचे दिसत आहे. तर दुसरीकडे दिशा वकानीने मालिकेस नकार दिला तर दुसऱ्या अभिनेत्रीची निवड करण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे.

पाहा : ‘तारक मेहता…’मधील जेठालालापासून ते बबितापर्यंत जाणून घ्या कलाकारांची एकूण संपत्ती

मालिकेच्या निर्मात्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिशाच्या घरातल्यांनी अनेक अटी घातल्यामुळे ती शोमध्ये दिसणे थोडे कठिण झाले आहे. पण मालिकेत दया बेनची एण्ट्री होणार असे म्हटले जात आहे.

सब टीव्हीची ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिका प्रेक्षकांमध्ये फारच प्रसिद्ध आहे. ही मालिका लहान मुलांपासून ते आजी-आजोबांपर्यंत सारेच आवडीने पाहतात. गेल्या अनेक वर्षांपासून टीआरपीच्या शर्यतीत या मालिकेने टॉप- १० मधील आपले स्थान कधीही हलू दिलेले नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 28, 2020 3:31 pm

Web Title: tarak mehta ka ulta chashma dayaben comeback avb 95
Next Stories
1 सोफी टर्नरने पहिल्यांदाच पोस्ट केले गरोदरपणातील फोटो
2 महिला कलाकारांचीच चौकशी का केली जातेय?; अभिनेत्रीचा NCBला सवाल
3 सुशांतपाठोपाठ आता रिया चक्रवर्तीच्या जीवनावर येणार चित्रपट?
Just Now!
X