News Flash

‘गोपी बहू’ला लाखोंचा गंडा

'साथ निभाना साथिया' मालिकेत देवोलिनाने मुख्य भूमिका साकारली होती.

देवोलिना भट्टाचार्जी

‘साथ निभाना साथिया’ फेम अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जी म्हणजेच प्रेक्षकांच्या लाडक्या ‘गोपी बहू’ला लाखो रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. आपल्या बँक खात्यातून एकाएकी सोळा लाख रुपयांची रक्कम काढल्याचं कळताच देवोलिनाच्या हा सर्व प्रकार लक्षात आला.

आज सकाळीच मला बॅंकेचा मेसेज आला. माझ्या खात्यातून १६ लाख रुपये काढण्यात आले आहेत, असं त्यात लिहिलं गेलं होतं. मला काही क्षणांसाठी गोष्टी कळतच नव्हत्या. म्हणजे नेमकं कसं व्यक्त व्हावं हेच मला कळत नव्हतं. त्यानंतर मी लगेचच आईला आणि माझ्या बॅंक मॅनेजरला याविषयी कळवलं. रात्री एक वाजण्याच्या सुमारास माझ्या खात्यातून हे पैसे काढले गेले’, असं देवोलिना ‘टाईम्स ऑफ इंडिया’शी संवाद साधताना म्हणाली.

मेहनतीने कमवलेले पैसे असे एकाएकी कोणीतरी आपल्या खात्यातून काढून घेतल्यामुळे देवोलिनाला धक्काच बसला आहे. पण, सध्या या प्रकरणी चैकशी करण्यासाठी मी बँकमध्ये जाणार असून, माझ्या वकिलांशीही याविषयी पुढे काय कारवाई करणार याविषयी सल्लामसलत करणार असल्याचं तिने स्पष्ट केलं. ‘या क्षणाला मी खूपच वैतागले आहे. इतक्या मेहनतीने कमावलेले पैसे कोणी असं अगदी सहजपणे चोरतात. एकिकडे सरकारकडून आपल्याला कॅशलेस होण्यास सांगण्यात येत आहे. पण, आता तर खात्यात असणाऱ्या पैशांनाही सुरक्षितता नाही. हॅकर्सना सर्व गोष्टी माहित आहेत, पण ते या सर्व माहितीचा वापर चुकीच्या पद्धतीने करत आहेत. आतातरी या हॅकर्सनी त्यांच्या गुणांचा वापर चांगल्या कामांसाठी करावा अशी मी आशा करते, असं देवोलिना म्हणाली.

वाचा : Ball Tampering: डेव्हिड वॉर्नरची टीमच्या व्हॉट्स अॅप ग्रुपमधून एक्झिट

आपल्यासोबत झालेल्या या प्रसंगानंतर देवोलिनाने तिच्या चाहत्यांना सतर्कतेचा इशारा दिला असून, सोशल मीडिया अकाऊंटच्या बाबतीतही सजग राहण्याचा सल्ला दिला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 28, 2018 5:54 pm

Web Title: television serial saath nibhana saathiya fame actress devoleena bhattacharjee bank account hacked rs 16 lakh stolen
Next Stories
1 तीस वर्षापूर्वीचं चाळीतलं घर पाहून इमोशनल झाला जॅकीदादा
2 VIDEO : राजकुमार राव, श्रद्धा कपूर ‘दिल से’ गातात तेव्हा
3 …जेव्हा प्रसिद्ध पाकिस्तानी अभिनेत्री ‘आई हूं यूपी-बिहार लूटने’ गाण्यावर थिरकते
Just Now!
X