20 September 2020

News Flash

Video : चर्चा तर होणारच ! २९ डिसेंबरपासून कपिल येतोय प्रेक्षकांच्या भेटीला

किक्कू शारदा, भारती सिंग, चंदन प्रभाकर, सुमोना चक्रवर्ती या सहकलाकरांच्या जोडीनं कपिल हा शो घेऊन येत आहे.

गेल्या कित्येक महिन्यांपासून कपिलच्या पुनरागमनाची चर्चा सुरू होती. कपिल कधी एकदा छोट्या पडद्यावर परततो हे पाहण्यासाठी त्याचे चाहतेही उत्सुक होते. अखेर चाहत्यांची उत्सुकता फार न ताणता पुढच्या आठवड्यापासून कपिल प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाला आहे.

कपिलच्या ‘द कपिल शर्मा शो’च्या पहिल्या भागाचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे पहिल्याच भागात सहभागी होण्याची संधी रणवीर सिंग आणि सारा अली खानला मिळाली आहे. सारा आणि रणवीर ‘सिम्बा’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कपिलच्या शर्मा शोमध्ये येणार आहे. या भागाचं चित्रीकरण झालं असून प्रोमोमध्ये रणवीर सारा कपिलच्या कॉमेडी शोचा आनंद लुटताना दिसत आहे.

२९ डिसेंबरला कपिल शर्मा शोचा पहिला भाग प्रदर्शित होणार आहे. किक्कू शारदा, भारती सिंग, चंदन प्रभाकर, सुमोना चक्रवर्ती या सहकलाकरांच्या जोडीनं कपिल हा शो घेऊन येत आहे. कपिल प्रेयसी गिन्नी छत्रतसोबत गेल्याच आठवड्यात विवाहबंधनात अडकला. विवाहनंतर त्यानं लगेचच चित्रीकरणाला सुरूवात केली. कपिलच्या नव्या शोमध्ये लवकरच सलमान खान आणि त्याचे वडिल सलिम खानही दिसणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 19, 2018 4:51 pm

Web Title: the kapil sharma show first episode teaser with ranveer and sara
Next Stories
1 स्वरा भास्कर ‘या’ वेब सीरिजमधून मांडणार स्त्री जीवनाचा झगडा
2 ‘या’ तारखेला विक्रांत-इशा अडकणार विवाहबंधनात
3 बॉलिवूडच्या ‘खान’दानला मात देत दीपिका ठरली ‘नंबर वन स्टार’
Just Now!
X