24 October 2020

News Flash

जान्हवी म्हणते, माझी साराशी स्पर्धा नाहीच!

२०१८ हे वर्ष दोन्ही स्टारकिडसाठी खऱ्या अर्थानं महत्त्वाचं ठरलं आहे. या दोघींमध्ये इण्टस्ट्रीत येण्यापासूनच छुपी स्पर्धा सुरू असल्याचं म्हटलं जात होतं.

सारा खानही 'केदारनाथ' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

श्रीदेवी आणि बोनी कपूरची मुलगी जान्हवी ‘धडक’ चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. तर दुसरीकडे सारा खानही ‘केदारनाथ’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यामुळे २०१८ हे वर्ष दोन्ही स्टारकिडसाठी खऱ्या अर्थानं महत्त्वाचं ठरलं आहे. या दोघींमध्ये इण्टस्ट्रीत येण्यापासूनच छुपी स्पर्धा सुरू असल्याचं म्हटलं जात होतं मात्र ही गोष्ट जान्हवीनं मोठ्या खुबीनं नाकारली आहे.

साधरण वर्षभरापूर्वी सारा आणि जान्हवी एकाच वर्षात बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे याबद्दल श्रीदेवींना काही प्रश्न विचारण्यात आले होते. त्यावेळी स्पर्धा कोणालाही चुकत नसते, स्पर्धा असली की तुम्ही सतत कार्यरत राहता आणि दुप्पटीनं मेहनत करता असं श्रीदेवी म्हणाल्या होत्या. तेव्हापासून जान्हवी आणि सारात स्पर्धा असल्याचं म्हटलं जात होतं. याबद्दल जान्हवीला विचारलं तेव्हा मात्र तिनं स्पर्धा नसल्याचं स्पष्ट केलं. ‘इण्टस्ट्रीतल्या महिलांनी एकमेकांना पाठिंबा दिला पाहिजे, मी प्रेक्षक म्हणून साराचा चित्रपट पाहण्यास उत्सुक आहे’ असं जान्हवी म्हणाली.

सारा सुशांत सिंग राजपुतसोबत ‘केदारनाथ’ चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहे. हा चित्रपट प्रदर्शित व्हायला अजूनही अवकाश आहे मात्र त्याआधीच साराच्या वाट्याला रोहित शेट्टीचा ‘सिम्बा’ चित्रपटदेखील आला आहे. तर जान्हवीच्या हातात मात्र कोणताही चित्रपट नाही. धडक प्रदर्शित होत नाही तोपर्यंत नवीन चित्रपट साईन करणार नाही असंही जान्हवीनं ठरवलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 19, 2018 11:08 am

Web Title: there is no competition with sara ali khan said janhvi kapoor
Next Stories
1 बिग बींची जाहिरात वादाच्या भोवऱ्यात, बँक कर्मचाऱ्यांच्या भावना दुखावल्याचा आरोप
2 ते ही म्हणत आहेत.. ‘सब’कुछ पु. ल.
3 डोंबिवलीच्या खड्ड्यात कुशल बद्रिकेची साखर पेरणी
Just Now!
X