नवीन वर्षाच्या स्वागताची सर्वत्र तयारी सुरु झाली आहे. त्याचसोबत सरत्या वर्षात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा आवर्जून घेतला जातो. ज्या बॉलिवूड चित्रपटांचे हॅशटॅग ट्विटरवर सर्वाधिक ट्रेण्ड झाले, ज्यांची सर्वांत जास्त चर्चा झाली अशा टॉप १० चित्रपटांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीनुसार शाहरुख खान ट्विटरवरही किंग ठरलाय असं म्हणायला हरकत नाही.

१. शाहरुखच्या ‘रईस’ या चित्रपटाची या वर्षभरात ट्विटरवर सर्वाधिक चर्चा झाली. राहुल ढोलकिया दिग्दर्शित गुजरातच्या पार्श्वभूमीवरील या चित्रपटाची कथा दारूच्या तस्करीशी निगडीत आहे. यामध्ये पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानने भूमिका साकारली असून त्यावर बराच वाद झाला होता.

tiger zinda hai

२. वर्षाअखेर प्रदर्शित होऊनही सलमान खान आणि कतरिना कैफचा ‘टायगर जिंदा है’ या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या तीन दिवसांत या चित्रपटाने दीडशे कोटींची कमाई केली असून हा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे.

३. सलमानचाच आणखी एक चित्रपट ‘ट्युबलाइट’ तिसऱ्या स्थानावर आहे. बॉक्स ऑफीसवर जरी ‘ट्युबलाइट’ने अपेक्षित कामगिरी केली नसली तरी ट्विटरवर त्याची चांगलीच चर्चा झाली.

padmavati

४. चौथ्या क्रमांकावर संजय लीला भन्साळी यांचा ‘पद्मावती’ हा चित्रपट आहे. या चित्रपटाला राजपूत संघटनांचा विरोध असल्याने बराच चर्चेत आलेला, किंबहुना अजूनही चर्चेत आहे. त्यासोबतच ‘पद्मावती’च्या प्रदर्शनाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.

५. हृतिक रोशन आणि यामी गौतम यांची मुख्य भूमिका असलेला ‘काबिल’ हा चित्रपट पाचव्या स्थानावर आहे.

shah rukh khan, jab harry met sejal

६. इम्तियाज अली दिग्दर्शित शाहरुख आणि अनुष्का शर्माचा ‘जब हॅरी मेट सेजल’ सहाव्या क्रमांकावर आहे.

toilet ek prem katha

७. बॉक्स ऑफीसवर चांगली कमाई केलेला आणि प्रेक्षक- समीक्षकांकडून प्रशंसा मिळवलेला ‘टॉयलेट : एक प्रेम कथा’ सातव्या स्थानावर आहे. यामध्ये अक्षय कुमार आणि भूमी पेडणेकरने मुख्य भूमिका साकारली होती.

८. आठव्या क्रमांकावर अजय देवगणचा ‘गोलमाल अगेन’ हा चित्रपट आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित या चित्रपटाची चांगलीच चर्चा पाहायला मिळालेली.

९. सलमान खानच्या ‘जुडवा’ या चित्रपटाचा सिक्वल ‘जुडवा २’ चांगलाच गाजलेला. वरुण धवनची दुहेरी भूमिका असलेला हा चित्रपट नवव्या स्थानावर आहे.

jagga jasoos

१०. दहाव्या क्रमांकावर बॉक्स ऑफीसवर अपयशी ठरलेला रणबीर कपूर आणि कतरिना कैफचा ‘जग्गा जासूस’ हा चित्रपट आहे.