News Flash

सलमान -रेमोमधील वादावर पडदा? रेमोच्या पत्नीने मानले भाईजानचे आभार

...म्हणून लीझलने मानले सलमानचे आभार

यंदाचा ख्रिसमस प्रसिद्ध कोरिओग्राफर व दिग्दर्शक रेमो डिसूझा आणि त्याच्या पत्नीसाठी खास आहे. काही दिवसापूर्वीच रेमोला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. मध्यंतरी त्याला हृदयविकाराचा झटका आला होता. त्यामुळे त्याला मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र, आता रेमोला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असून तो कुटुंबीयांसोबत ख्रिसमसचं सेलिब्रेशन करत आहे. यामध्येच रेमोच्या पत्नीची लीझेलची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये तिने अभिनेता सलमान खानचे आभार मानले आहे.

‘रेस 3’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अभिनेता सलमान खान आणि रेमो डिसूझा यांच्यात वादाची ठिणगी पडली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपाटून आपटल्यानंतर या दोघांमध्ये भांडणं झाल्याचं म्हटलं जात होतं. मात्र, याविषयी सलमान किंवा रेमोने कोणतंच मत व्यक्त केलं नव्हतं. परंतु, सोशल मीडियावर त्यांच्या भांडणाच्या बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या. यामध्येच लीझेलने नुकत्याच शेअर केलेल्या पोस्टमध्ये सलमानचे आभार मानले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Liz (@lizelleremodsouza)

धन्यवाद भाई…मला भावनिक पाठिंबा दिल्याबद्दल, असं म्हणत लीझलने सलमानचे आभार मानले. ११ डिसेंबर रोजी रेमोला हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात त्याला उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होतं. या काळात लीझेल आणि रेमोच्या मुलांना कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटींनी भावनिक पाठिंबा दिला होता. यात सलमानचाही समावेश होता.

दरम्यान, रेमो डिसूझा बॉलिवूडमधील लोकप्रिय व प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक आहे. त्याने अनेक हिट चित्रपटांची गाणी कोरिओग्राफ केली आहेत. यानंतर तो डान्स इंडिया डान्सचे जज होता. यशस्वी नृत्यदिग्दर्शक झाल्यावर त्याने दिग्दर्शनासाठीही प्रयत्न केला आणि ‘फालतू’ चित्रपटाचे दिग्दर्शन केलम. यानंतर २०१३ मध्ये त्याने ‘एबीसीडी’ हा डान्सवर आधारित चित्रपट दिग्दर्शित केला. या चित्रपटानंतर त्याने २०१५ मध्ये एबीसीडी 2 प्रदर्शित केला. या चित्रपटात वरुण धवन, श्रद्धा कपूर आणि प्रभुदेवा मुख्य भूमिकेत होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 26, 2020 11:27 am

Web Title: this christmas is very special for remo dsouza and his wife liezel salman khan ssj 93
Next Stories
1 ख्रिसमससाठी प्रियांकाची खास शॉपिंग; जॅकेटची किंमत ऐकून व्हाल थक्क!
2 “माझ्या शुभेच्छा फक्त त्यांनाच, जे…,”कंगनाच्या ख्रिसमसच्या खोचक शुभेच्छा
3 ललित प्रभाकरचा ‘टर्री’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; दिसणार नव्या अंदाजात