नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ चित्रपटाने संपूर्ण महाराष्ट्राला याड लावलं. त्यानंतर आता त्याचा हिंदी रिमेक ‘धडक’ प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. जान्हवी कपूर आणि इशान खट्टर यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘धडक’चा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे आणि पुन्हा एकदा प्रेक्षक ‘झिंगाट’ होतील यात काही शंका नाही. इशानचा हा दुसरा तर जान्हवीचा हा पहिलाच चित्रपट आहे. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान जान्हवी आणि इशानमध्ये चांगलीच मैत्री जमली. ट्रेलरसोबतच शूटिंगदरम्यानचे काही किस्से आता प्रेक्षकांसमोर येऊ लागले आहेत. असाच एक किस्सा जान्हवीने नुकताच सोशल मीडियावर शेअर केला आहे.

चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा एक कॅन्डीड फोटो जान्हवीने सोशल मीडियावर शेअर केला आहे ज्यामध्ये दोघंही एका विनोदावरून हसताना पाहायला मिळत आहेत. चित्रपटातील एका इंटिमेट सीनचं शूटिंग त्यावेळी सुरू होतं आणि त्यादरम्यान एकमेकांसोबत सहज वावरण्यासाठी वातावरण हलकंफुलकं करण्याचा हा प्रयत्न होता. इशान आणि जान्हवी यांच्यात थट्टामस्करी सुरू होती आणि तेव्हा सेटवरील एकाने हा फोटो काढला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

Video : हिंदी ‘झिंगाट’सह ‘धडक’ले जान्हवी- इशान

सध्या सोशल मीडियावर जान्हवी आणि इशानच्या या चित्रपटाची जोरदार चर्चा असून अनेकांना हा ट्रेलर आवडल्याचं दिसून येत आहे. आता ‘धडक’ला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. येत्या २० जुलैला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.