07 March 2021

News Flash

पैशांच्या बदल्यात परिणीती चोप्राला निकनं दिली ही मौल्यवान भेट

निकनं तिला ३७ कोटी जरी दिले नसले तरी एक खास भेटवस्तू मात्र आवर्जून दिली

बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन गायक निक जोनास यांच्या लग्नाला महिन्याभराचा अवधी उलटला. हे ‘बिग फॅट इंडियन वेडिंग’ या ना त्या कारणानं चर्चेत होतं. त्यातूनच ‘जुता छुपाई’साठी प्रियांकाची बहिण परिणीती चोप्रानं निककडून तब्बल ३७ कोटी मागितले होते. चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान मी निककडून ‘जुता छुपाई’ बदल्यात एवढी मोठी रक्कम मागितली आणि निक हसत तयारही झाला असल्याचं परिणीती गंमतीनं म्हणाली होती. निकनं तिला ३७ कोटी जरी दिले नसले तरी एक खास भेटवस्तू मात्र आवर्जून दिली होती. महिनाभरानंतर परिणीतीनं निकनं दिलेली ती मौल्यवान भेट काय होती याचा खुलास केला आहे.

एका मुलाखतीत तिला याबद्दल विचारलं होतं. त्यावेळी निकनं आम्हाला हिऱ्याची अंगठी दिल्याचं ती म्हणाली. ‘जुता छुपाई’च्या खेळात आम्ही निककडून मोठी रक्कम घेण्याचं ठरवलं होतं. पण निकनं पैशांपेक्षाही मौल्यवान आणि लक्षात राहिल अशी भेट आमच्यासाठी आणली. त्यानं प्रत्येक बाइडमेड्ससाठी हिऱ्याची अंगठी आणली होती असं परिणीती या मुलाखतीत म्हणाली.

प्रियांका आणि निक १ आणि २ डिसेंबरला विवाहबंधनात अडकले होते. जोधपुरमधल्या उमेद भवन पॅलेसमध्ये या दोघांचा ख्रिश्चन आणि पारंपरिक भारतीय पद्धतीनं विवाहसोहळा पार पडला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 29, 2019 1:51 pm

Web Title: this is what nick jonas gave parineeti chopra on joote chupai ceremony
Next Stories
1 Video : ‘उमंग’मध्ये जान्हवीच्या लावणीचा तडका, तर साराच्या ‘आंख मारे’चा जलवा
2 रवी किशनच्या मुलीचं पद्मिनी कोल्हापुरेच्या मुलासोबत बॉलिवूड पदार्पण
3 आता तरी तिला एकटं सोडा; कंगनाच्या मदतीला पुन्हा धावून आली बहीण
Just Now!
X