‘बाहुबली’नंतर अभिनेता प्रभासचा बहुचर्चित व बहुप्रतिक्षित चित्रपट ‘साहो’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये अभिनेत्री श्रद्धा कपूर प्रभाससोबत रोमान्स करताना दिसणार आहे. दोघंही या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करत आहेत. ‘नच बलिये’ या रिअॅलिटी शोमध्ये प्रभास-श्रद्धाने नुकतीच हजेरी लावली होती. या शोमध्ये प्रभास अभिनेत्री रवीना टंडनसोबत ‘टिप टिप बरसा पानी’ या प्रसिद्ध गाण्यावर थिरकला. या डान्सचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मूळ गाण्यात रवीना पिवळ्या रंगाच्या साडीत दिसली होती. या एपिसोडसाठीही तिने त्याच रंगाची साडी परिधान केली असून प्रभाससोबतची तिची केमिस्ट्री पाहण्याजोगी आहे.
Video : जेनेलियाचा पाच वर्षांनंतर रॅम्पवर जलवा; रितेशही भारावला
‘साहो’ हा चित्रपट तेलुगू, तामिळ, हिंदी या तिन्ही भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. सुजित दिग्दर्शित हा चित्रपट येत्या ३० ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार असून यामध्ये प्रभास आणि श्रद्धासोबतच नील नितीन मुकेश, महेश मांजरेकर, मंदिरा बेदी, जॅकी श्रॉफ आणि चंकी पांडे यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. चित्रपटात अॅक्शन सीन्सचा भरणा असून त्यासाठी हॉलिवूडमधील ५० लोकांची एक टीम भारतात बोलावण्यात आली होती. या टीमने प्रभासला अॅक्शन सीनसाठी प्रशिक्षण दिले. या प्रशिक्षणात सहभागी असलेल्या ५० लोकांनी अनेक हॉलिवूड चित्रपटांसाठी काम केले होते.