अभिनेता टायगर श्रॉफ हा त्याच्या अॅक्शन सीनसाठी बॉलिवूडमध्ये ओळखला जातो. अनेक वेळा चाहत्यांमध्ये टायगरच्या दमदार अॅक्शन सीनसोबतच त्याच्या नृत्य कौशल्याचीही चर्चा होत असते. सध्या सोशल मीडियावर टायगरचा एक डान्स व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे.

नृत्यकलेची आवड असणारा टायगर सिंगिग विश्वातही आपली एक ओळख निर्माण करण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे. टायगरचे एक नवे गाणे प्रदर्शित झाले आहे. या गाण्याचे नाव ‘कॅसनोवा’ आहे. या गाण्यात टायगरने अप्रतिम डान्स केला आहे.


हे गाणं टायगरने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंवरही शेअर केलं आहे. ‘मी खूप उत्सुक आहे. माझं नवं गाणं प्रदर्शित झालं आहे. मला आशा आहे की तुम्हाला सगळ्यांना हे गाणं आवडेल’ या आशयाच कॅप्शन टायगरने त्या व्हिडीओला दिलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

टायगरने ‘हीरोपंती’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. टायगर लवकरच ‘हीरोपंती 2’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री तारा सुतारिया स्क्रीन शेअर करणार असल्याचं म्हटलं जात आहे. टायगरचा हा चित्रपट १६ जुलै रोजी प्रदर्शित होणार असल्याचे म्हटले जात आहे.