‘हम गरीब हुए तो क्या हुआ…’ पासून ‘नया है वह’ आणि ‘चला हवा येऊ द्या’ सारखे संवाद गाजलेल्या ‘टीपी’ अर्थात ‘टाईमपास’चा सिक्वल १ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचा पहिला ट्रेलर रविवारी प्रदर्शित करण्यात आला. रविवारी दुपारी १२ वाजता प्रदर्शित करण्यात आलेल्या या ट्रेलरला तीन दिवसात सव्वा तीनलाख व्ह्यूज मिळाले आहेत. इतकेच नाही तर युट्यूबवर बघितल्या गेलेल्या भारतातील टॉप ५ व्हिडिओपैकी एक ‘टीपी २’चा ट्रेलर असल्याची माहिती दिग्दर्शक रवी जाधवने दिली आहे.
‘टीपी’मध्ये प्रथमेश परबने दगडूची तर केतकी माटेगांवकरने प्राजूची भूमिका साकारली होती. ‘टीपी’चा सिक्वल अर्थात ‘टाईमपास २’ मध्ये प्राजूची भूमिका प्रिया बापट, तर दगडूची भूमिका प्रियदर्शन जाधव साकारणार आहे. ३३ कोटींचा गल्ला जमावणा-या ‘टाइमपास’चा सिक्वल म्हणजे ‘टाइमपास २’ प्रेक्षकांवर जादू चालविण्यात यशस्वी होतो का ते पाहणे औत्सुक्याचे राहिल.
पाहाः ‘टीपी २’चा ट्रेलर