20 October 2019

News Flash

बॉलिवूड कलाकारांनी ‘या’ गाण्यातून वाहिली शहीदांना श्रद्धांजली

दहशतवादी हल्लात ४० भारतीय वीर जवानांनी आपल्या प्रणाची आहुती दिली होती.

जैश ए महम्मदच्या अतिरेक्याने पुलवामा जिल्ह्यात चढविलेल्या भीषण आत्मघातकी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. बॉलिवूड कलाकारांनीही या घटनेचा निषेध नोंदविला होता. दहशतवादी हल्लात ४० भारतीय वीर जवानांनी आपल्या प्रणाची आहुती दिली होती. याच पार्श्वभूमीवर शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सीआरपीएफने बॉलिवूडमधील काही कलाकारांसह एक गाणं चित्रीत केलं आहे.

सीआरपीएफने अभिनेता अमिताभ बच्चन, रणबीर कपूर आणि आमिर खान यांच्यासह हे गाणे चित्रीत केले असून ”तू देश मेरा” असे या गाण्याचे शीर्षक आहे. सीआरपीएफने त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून हे फोटो शेअर केले आहेत.

सीआरपीएफने शेअर केलेल्या फोटोच्या कॅप्शनमधून रणबीर, आमिर आणि अमिताभ यांचे आभार मानले आहेत. त्यासोबतच तू देश मेरा” या गाण्यामधून पुलवामा हल्ल्यात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या जवानांना हे गाणं समर्पित केल्याचंदेखील म्हटलं आहे.

 

First Published on April 22, 2019 3:58 pm

Web Title: tribute to martyrs aamir ranbir amitabh came together