छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये होणाऱ्या घडामोडी, त्यात येणारे ट्विस्ट यांमुळे त्यांची लोकप्रियता दर आठवड्याला कमी-जास्त होत असते. कोणती मालिका जास्त पाहिली जात आहे तर कोणाची लोकप्रियता घटली हे दर आठवड्याला येणाऱ्या टीआरपी रेटिंगमुळे कळतं. चला तर मग जाणून घेऊयात गेल्या आठवड्यात म्हणजेच १७ नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबर या कालावधीत कोणत्या मालिकेचं वर्चस्व राहिलं?

विशेष म्हणजे या आठवड्यात टॉप ५ मराठी मालिका या झी मराठी वाहिनीच्याच आहेत. त्यातही ‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही मालिका नेहमीप्रमाणे अग्रस्थानी आहे. राधिका, शनाया आणि गुरुच्या आयुष्यात येणारे ट्विस्ट प्रेक्षकांना मालिकेत गुंतवून ठेवण्यात यशस्वी ठरत आहेत.

अल्पावधीतच लोकप्रिय ठरलेली सुबोध भावे व गायत्री दातार यांची मालिका ‘तुला पाहते रे’ दुसऱ्या स्थानावर आहे. विक्रांत सरंजामे इशासाठी त्याचं प्रेम व्यक्त करत आहे आणि यामुळेच मालिकेची लोकप्रियता कायम आहे.

तिसऱ्या क्रमांकावर ‘तुझ्यात जीव रंगला’ ही मालिका आहे. रविवारी या मालिकेचा महाएपिसोड झाला. पण त्याचे परिणाम पुढच्या आठवड्यात दिसून येतील. सध्या तरी मालिकेच्या प्रेक्षकवर्गानं साथ सोडली नाही.

वाचा : प्रमुख पाहुणे म्हणून गेलेल्या मंडळावरच तुकाराम मुंढेंनी केली होती कारवाई

‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ही मालिका चौथ्या स्थानावर आहे. या मालिकेसाठी हा आठवडा महत्त्वाचा ठरला. कारण शिवाजी महाराजांचं देहावसान, शंभू महाराजांना रायगडापासून दूर ठेवणं, अष्टप्रधान मंडळाचं सुरू झालेलं राजकारण अशा बऱ्याच गोष्टी या आठवड्यात घडल्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाचव्या स्थानी ‘चला हवा येऊ द्या’ हा शो आहे.