News Flash

Tubelight trailer Watch Video : जाणून घ्या ‘ट्युबलाइट’चा ट्रेलर कधी प्रदर्शित होईल, कुठे बघता येईल?

बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित अशा ‘ट्युबलाइट’ चित्रपटाचा ट्रेलर आज, गुरुवारी प्रदर्शित होणार आहे.

सलमानच्या ‘ट्युबलाइट’चा ट्रेलर प्रदर्शित होणार आहे.

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान याच्या बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित अशा ‘ट्युबलाइट’ चित्रपटाचा ट्रेलर आज, गुरुवारी प्रदर्शित होणार आहे. सलमान आणि दिग्दर्शक कबीर खान ‘ट्युबलाइट’च्या निमित्ताने तिसऱ्यांदा एकत्र आले आहेत. काही दिवसांपूर्वीच चित्रपटातील ‘रेडिओ साँग’ प्रदर्शित करण्यात आले होते. त्यानंतर चाहत्यांच्या आग्रहाखातर सलमानने चित्रपटाच्या ट्रेलर लाँचची अधिकृत वेळ सोशल मीडियावर जाहीर केली आहे. सलमानने त्याच्या ट्विटर हॅण्डलवर चित्रपटाचे एक पोस्टर ट्विट करत ट्रेलर लाँचबद्दल सर्व माहिती दिली आहे. त्यामुळे या ‘दबंग’ कलाकाराच्या चाहत्यांना आता अजून काही तास वाट पाहावी लागणार आहे.

‘ट्युबलाइट’चा ट्रेलर कधी प्रदर्शित होईल?

गुरुवार, २५ मे २०१७ रोजी रात्री ८ वा. ५९ मि. सलमानच्या ‘ट्युबलाइट’चा ट्रेलर प्रदर्शित होणार आहे.

प्रदर्शित झाल्यावर ‘ट्युबलाइट’ ट्रेलर कुठे बघता येईल?

तुम्हाला हा ट्रेलर स्टार इंडिया, एसकेफिल्म्स ऑफिशिअल, कबीर खान, अमर बुटाला आणि ट्युबलाइट की ईद या ट्विटर हॅण्डल्सवर पाहता येईल. (@starindia @skfilmsofficial @kabirkhankk @amarbutala @TubelightKiEid )

‘ट्युबलाइट’ ट्रेलरबद्दल अपडेट्स कुठे वाचता येतील?

loksatta.com वर संध्याकाळपासून तुम्ही ट्रेलर लाँचचे सर्व लाइव्ह अपडेट्स वाचू शकता.

‘ट्युबलाइट’ चित्रपटामध्ये कोणकोणते कलाकार आहेत?

बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान, त्याचा लहान भाऊ सोहेल खान, चिनी अभिनेत्री झू झू, बालकलाकार माटिन रे तंगू आणि दिवंगत अभिनेते ओम पुरी यांच्या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत.

‘ट्युबलाईट’ सिनेमा कधी प्रदर्शित होणार आहे?

ईदच्या मुहूर्तावर २३ जून २०१७ रोजी हा चित्रपट देशभरात प्रदर्शित होणार आहे.

सोशल मीडियावर सलमानच्या चाहत्यांमध्ये ‘ट्युबलाइट’चा ट्रेलरबद्दल बरीच उत्सुकता आहे. नेटिझन्सने ट्रेलर लाँच होण्याआधीच ट्विट करण्यास सुरुवात केली असून, #TubelightTrailer हा हॅशटॅग आता ट्रेंडमध्ये आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 25, 2017 5:13 pm

Web Title: tubelight trailer launch date and time details salman khan and kabir khan
Next Stories
1 ‘तो माणूस नव्हे हैवान होता’
2 एसएस राजामौलीच्या चित्रपटाची कथा चोरल्याचा ‘राबता’वर आरोप
3 कपिलच्या शोमध्ये क्रिकेटर्सची विनोदी खेळी
Just Now!
X