‘चालतंय की’ म्हणत समस्त मराठी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतील पहिलवान गडी राणादा सध्या खूपच लोकप्रिय झाला आहे. अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना राणाने वेड लावल आहे. या मालिकेतील राणा आणि पाठकबाई या जोडीमध्ये प्रेक्षकांचा जीव गुंतलाय, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. आता ही मालिका एका वेगळ्या वळणावर येऊन पोहोचली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कुस्तीवर जीवापाड प्रेम करणाऱ्या राणादाने कुस्ती सोडून पोलिसात भरती होण्याचा निर्णय घेतला आहे. उदनिर्वाह करण्यासाठी नोकरी करणे गरजेचे आहे हे राणादाला समजून चुकले आहे. म्हणून रानादा नोकरी करण्याचा निर्णय घेतो. त्याचा हा निर्णय ऐकून पाठकबाई आनंदी झाल्या आहेत आणि त्यांनी राणादाला पाठिंबा देण्याचे ठरवले आहे. राणाने त्याचे पुढील शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे त्याने नोकरी शोधण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान त्याला स्पोर्ट्स कोटामधून पोलिस भरती सुरु असल्याची माहिती मिळते. आता राणादा तेथे जाऊन भरती होणार असून ट्रेनिंग घेणार आहे.

‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतील कुस्ती खेळणारा राणादा आता पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. राणादाची ही वेगळी भूमिका आणि रुप पाहण्यासाठी चाहते उत्साही असल्याचे दिसत आहे. ते राणादाला पोलिसालाच्या भूमिकेत पाहण्यासाठी आतुर आहेत.

आणखी वाचा : रिलेशनशिप स्टेटसबद्दल रिंकूनं सोडलं मौन, म्हणाली…

‘तुझ्यात जीव रंगला’ ही मालिका ३ ऑक्टोबर २०१६ रोजी सुरु झाली असून दररोज संध्याकाळी ७:३० वाजता झी मराठी चॅनेलवर प्रदर्शित होते. या मालिकेत हार्दिक जोशी (राणा दा), अक्षया देवधर (पाठक बाई ), छाया सानगावकर (गोदाक्का), धनश्री काडगावकर (नंदिता), राज हानचांगले (सनी दा), अमोल नाईक (बरकत), दिप्ती सोनावणे (चंदा) हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसत आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tujhat jiv rangala ranada is going to play role of police avb
First published on: 25-10-2019 at 17:29 IST