16 November 2019

News Flash

अनपेक्षित! ‘तुझ्यात जीव रंगला’मधून राणाची एक्झिट?

या मालिकेच्या सेट वरील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत

‘चालतंय की’ म्हणत समस्त मराठी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतील पहिलवान गडी राणादा सध्या खूपच लोकप्रिय झाला आहे. अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना राणाने वेड लावल आहे. या मालिकेतील राणा आणि पाठकबाई या जोडीमध्ये प्रेक्षकांचा जीव गुंतलाय, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. आता या मालिकेत एक धक्कादायक वळण येणार आहे.

‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेच्या सेटवरील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोंवरुन मालिकेत राणा दाचा मृत्यू होणार असल्याचे म्हटले जात आहे. राणाचा मृत्यू हा चाहत्यांसाठी धक्काच असणार आहे. आता राणा दा पुन्हा मालिकेत दिसणार की नाही किंवा त्याच्या जागी दुसरा कोणता कालाकार दिसणार असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडणार आहेत. परंतु मालिकेतील राणा दाचा प्रवास इथेच संपला आहे की हार्दिकने एका नव्या प्रोजेक्टसाठी ही मालिका सोडली आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

‘तुझ्यात जीव रंगला’ ही मालिका ३ ऑक्टोबर २०१६ रोजी सुरु झाली असून दररोज संध्याकाळी ७:३० वाजता झी मराठी चॅनेलवर प्रदर्शित होते. या मालिकेत हार्दिक जोशी (राणा दा), अक्षया देवधर (पाठक बाई ), छाया सानगावकर (गोदाक्का), धनश्री काडगावकर (नंदिता), राज हानचांगले (सनी दा), अमोल नाईक (बरकत), दिप्ती सोनावणे (चंदा) हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसत आहेत.

First Published on June 13, 2019 8:29 am

Web Title: tujhat jiv rangala serial character ranada is quitting serial avb 95