News Flash

‘तुला पाहते रे’ : या दिवशी विक्रांत करणार इशाला प्रपोज

मालिकेचा एक तासाचा विशेष भाग या दिवशी प्रसारित होणार.

tula pahate re
सुबोध भावे, गायत्री दातार

‘तुला पाहते रे’ ही वय विसरायला लावणारी जगावेगळी प्रेम कहाणी झी मराठी वाहिनी प्रेक्षकांसाठी घेऊन आली. अल्पावधितच या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली. यामध्ये अभिनेता सुबोध भावे आणि नवोदित अभिनेत्री गायत्री दातार मुख्य भूमिका साकारत आहे. विक्रांत सरंजामे आणि इशा निमकर यांच्यातली रोमॅण्टिक केमिस्ट्री प्रेक्षकांना सर्वाधिक आवडू लागली आहे. या मालिकेत काय वळण येणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली असते. विक्रांत आणि इशाची ही प्रेमकहाणी आता लवकरच पुढच्या टप्प्यावर पोहोचणार आहे. विक्रांत इशाला प्रपोज करणार आहे. या विशेष भागासाठी मालिकेचे निर्माते तारीख ठरवत आहेत.

विक्रांत आणि इशा यांनी बऱ्याच वेळा एकमेकांकडे अप्रत्यक्षपणे प्रेम व्यक्त केलं आहे. पण आता विक्रांत आपल्या खास अंदाजात इशाला प्रपोज करणार आहे. चाहत्यांना हा विशेष एपिसोड येत्या ९ डिसेंबर रोजी पाहायला मिळणार आहे. रविवारी ९ डिसेंबर रोजी एक तासाचा विशेष एपिसोड प्रसारित करण्याचा विचार निर्माते करत आहेत.

सध्या विक्रांत आणि इशाच्या प्रेमकहाणीत बरेच चढउतार येत आहेत. विक्रांतचा शत्रू जालिंदर याच्या एण्ट्रीमुळे मालिकेत नवा ट्विस्ट आला आहे. हा जालिंदर विक्रांतविरोधात इशाला भडकावण्याचाही प्रयत्न करत आहे. तेव्हा या अडचणी पार करत विक्रांत इशाचं मन कसं जिंकणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 23, 2018 6:12 pm

Web Title: tula pahate re updates on this day vikrant will propose isha
Next Stories
1 स्लमडॉग मिलेनिअर फेम अभिनेत्री फ्रीडा पिंटो लवकरच अडकणार विवाहबंधनात
2 ‘असूरा’च्या माध्यमातून अर्शद वारसीचं वेब विश्वात पदार्पण
3 राहुल महाजन तिसऱ्यांदा बोहल्यावर, कझाकिस्तानी प्रेयसीशी लग्न
Just Now!
X