05 March 2021

News Flash

Tumhari Sulu first poster: अन् विद्या बालन ठरली विजेती

फक्त ४२ दिवसांत चित्रपटाची शूटिंग झाली.

१४ सप्टेंबर रोजी 'तुम्हारी सुलू'चा फर्स्ट लूक प्रसिद्ध होणार

अभिनेत्री विद्या बालनचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘तुम्हारी सुलू’चा पहिला पोस्टर नुकताच प्रदर्शित झालाय. ‘एलिप्सिस एन्टरटेन्मेंट’ या प्रॉडक्शन हाऊसने आपल्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केलेला फोटो विद्याने रिट्विट केलाय. ‘हर कॉन्टेस्ट मे विनर है,’ असा कॅप्शन या फोटोला देण्यात आलाय.

एका गृहिणीचा रेडिओ जॉकी होईपर्यंतचा प्रवास या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. पोस्टरमध्ये विद्याच्या एका हातात भाजीची पिशवी आणि दुसऱ्या हातात स्पर्धांमध्ये जिंकलेल्या भेटवस्तू पाहायला मिळत आहेत. पण विद्याचा चेहरा मात्र यामध्ये दिसत नाही. पोस्टरच्या कॅप्शनमध्ये लिहिलेला ‘मै कर सकती है’ #MainKarSaktiHai हा हॅशटॅग विशेष लक्ष वेधून घेतोय. या हॅशटॅगचा नेमका काय अर्थ आहे हे जाणून घेण्यासाठी १४ सप्टेंबरपर्यंत तुम्हाला वाट पाहावी लागणार आहे. कारण १४ सप्टेंबर रोजी चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रसिद्ध होणार आहे.
याआधी ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ चित्रपटातील विद्याने साकारलेल्या रेडिओ जॉकीच्या भूमिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळालेला. त्यामुळे आतासुद्धा सुलोचना म्हणजेच सुलूच्या भूमिकेत विद्याला पाहणं औत्सुक्याचं असेल. सुरेश त्रिवेणी दिग्दर्शित ‘तुम्हारी सुलू’ हा चित्रपट १ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. नेहा धुपिया, आरजे मलिष्का आणि मानव कौल यांच्याही चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत.

वाचा : कंगना वेडी झाली आहे: आदित्य पांचोली

या चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणजे फक्त ४२ दिवसांत याची शूटिंग करण्यात आली. २३ एप्रिलला शूटिंगला सुरुवात झाली आणि जूनमध्ये चित्रपटाचं शूटिंग संपलं. विद्याचा ‘बेगम जान’ चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला. त्यानंतर आता या चित्रपटाकडून प्रेक्षकांच्या खूप अपेक्षा आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 5, 2017 7:22 pm

Web Title: tumhari sulu first poster released vidya balan is rocking her sulochna avatar
Next Stories
1 कंगना वेडी झाली आहे: आदित्य पांचोली
2 ‘बाप्पानं सगळं पाहिलंय, तरीही पुढच्या वर्षी येणार का?’
3 PHOTOS : किंग खाननंतर ‘देसी गर्ल’ प्रियांकानंही घेतली दिलीप कुमार यांची भेट
Just Now!
X