‘तुझ्या इश्काचा नादखुळा’ या मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे संचित चौधरी. त्याची रघू ही भूमिका प्रेक्षकांना विशेष आवडत असल्याचे पाहायला मिळते आहे. संचित सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. नुकताच त्याने केलेली पोस्ट चर्चेत आहे. प्रवासात प्रत्येकाला चांगले व वाईट अनुभव येत असतात. असेच काहीसे संचित सोबत घडले आहे.

संचितने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोलिसांसोबतचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्याने ‘ काल खूप खतरनाक किस्सा झाला…. नागपूर येथून विमानाने मी मुंबईला आलो. विमानतळावर उतरल्यानंतर रिक्षा केली आणि सरळ चित्रीकरण सुरु असलेल्या मढ आयलँडला जायला निघालो. मी रिक्षामध्ये माझे सामान ठेवले. रस्त्यात मी रिक्षा थांबली आणि ATM मधून पैसे काढण्यासाठी खाली उतरलो. पैस काढले आणि बाहेर आलो तर माझ्या सामानासोबत रिक्षा गायब होती. मी घाबरलो. पाहिले ५ मिनिटे माझा विश्वासच बसत नव्हत की खरच रिक्षा तिथे नाहीय. खूप पळालो मागे पुढे सगळीकडे रिक्षा शोधत होतो…माझ्याकडे त्या रिक्षाचा नंबर नव्हता’ असे संचित म्हणाला.

आणखी वाचा : सरकारी नोकरी ते अभिनेता, ‘तुझ्या इश्काचा नादखुळा’मधील रघूचा थक्क करणारा प्रवास

नंतर संचित पोलिसात तक्रार करण्यासाठी पोलीस ठाण्यात गेला. तेथे त्याला तिच रिक्षा दिसली. तो आत गेला आणि पोलिसांना सर्व काही सांगू लागला. पोलिसांनी संचितला शांत केलं आणि रिक्षावाल्याला त्यांनीच पकडले आहे असे सांगितले. त्यानंतर संचितने मुंबई पोलिसांचे आभार मानले.

‘तुझ्या इश्काचा नादखुळा’ या मालिकेत अभिनेता संचित चौधरी आणि अक्षया हिंदळकर ही नवी जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळते आहे. एक हटके लव्हस्टोरी या मालिकेत दाखवण्यात आली आहे. स्टार प्रवाह प्रस्तुत या मालिकेची निर्मिती महेश तागडे यांच्या टेल अ टेल निर्मिती संस्थेअंतर्गत करण्यात आली आहे.