24 January 2020

News Flash

मोदींच्या संसारिक कोपरखळीवर ट्विंकलचा टोला, म्हणाली…

माझ्यामुळे तुमच्या संसारात शांतता नांदत असेल, अशी मोदींनी अक्षय कुमारला म्हटलं.

अभिनेता अक्षय कुमारने पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुलाखत घेतली. या मुलाखतीत नेहमीप्रमाणे राजकीय प्रश्न नव्हते, तर मोदींच्या खासगी आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी प्रश्न विचारण्यात आले. मोदींना राग येतो का, सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या मीम्सवर त्यांची प्रतिक्रिया, निवृत्तीनंतर काय करणार असे विविध प्रश्न अक्षय कुमारने विचारले. अक्षयने जेव्हा सोशल मीडियाबद्दल प्रश्न विचारला तेव्हा मोदींनी गमतीशीर पद्धतीने उत्तर दिलं. मी ट्विटरवर सक्रीय असतो आणि तुमची पत्नी ट्विंकल खन्ना यांचेही ट्विट मी वाचतो, असं ते म्हणाले. यावर आता ट्विंकल खन्नाने प्रतिक्रिया दिली आहे.

‘पंतप्रधानांना फक्त माझ्याविषयी माहिती नसून ते माझं लिखाणसुद्धा वाचतात, याकडे मी सकारात्मक दृष्टीकोनातून बघते,’ असं ट्विट तिने केलं. माझ्यामुळे तुमच्या संसारात शांतता नांदत असेल, अशी कोपरखळी मोदींनी अक्षय-ट्विंकलला मारली.

‘मी ट्विंकल खन्ना यांचेसुद्धा ट्विट्स वाचतो. कधी कधी मला वाटतं की ट्विटरवर त्या माझ्यावर ज्याप्रकारे राग व्यक्त करत असतात त्यामुळे तुमच्या संसारात शांतता नांदत असेल. कारण त्यांचा पूर्ण राग माझ्यावर निघतो. एकप्रकारे मी तुमची मदतच करत आहे,’ असं मोदींनी मुलाखतीत म्हटलं होतं.

First Published on April 24, 2019 12:45 pm

Web Title: twinkle khanna reply on pm narendra modi interview with akshay kumar
Next Stories
1 वरुण धवन अनोख्या पद्धतीने साजरा करतोय वाढदिवस
2 ‘मराठी चित्रपटाची निर्मिती करताना मिळाला ‘हा’ पहिला धडा’
3 ‘माझ्यामुळे तुमच्या संसारात शांतता नांदत असेल’; मोदींची अक्षय-ट्विंकलला कोपरखळी
Just Now!
X