13 December 2018

News Flash

‘जान्हवीची श्रीदेवी यांच्याशी तुलना नकोच’

'प्रत्येक कलाकाराचे एक वेगळे वैशिष्ट्य असते.'

जान्हवी कपूर, श्रीदेवी

अभिनेत्री श्रीदेवी यांच्या निधनानंतर कलाविश्वात आणि कपूर कुटुंबात एक पोकळी निर्माण झाली. मुलगी जान्हवी कपूरचा पहिलावहिला चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच त्यांचे निधन झाले. लेकीच्या पदार्पणाच्या चित्रपटासाठी त्या खूप उत्सुक होत्या. आईचे हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी जान्हवी पुन्हा एकदा कामावर रुजू झाली आहे. तिच्या आगामी ‘धडक’ या चित्रपटातील एका गाण्याची कोरिओग्राफी फराह खानने केली आहे. फराहने श्रीदेवी यांच्यासोबतही काम केले. मात्र आता जान्हवीची तुलना श्रीदेवी यांच्याशी करणे योग्य नसल्याचे मत फराहने मांडले आहे.

जान्हवीच्या पदार्पणासोबतच तिच्या अभिनय आणि नृत्याची चर्चा होऊ लागली आहे. हावभाव आणि नृत्याविष्काराने श्रीदेवी यांनी चाहत्यांची मनं जिंकली होती. तर जान्हवीसुद्धा त्यांच्याप्रमाणेच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवू शकेल का, असा प्रश्न अनेकांकडूनच उपस्थित केला जात आहे. या तुलनेवर फराहने तिचे मत मांडले. ‘प्रत्येक कलाकाराचे एक वेगळे वैशिष्ट्य असते आणि त्याचा आदर आपण केला पाहिजे. जान्हवी उत्तम नृत्य करते पण तिची श्रीदेवी यांच्याशी तुलना करणे अयोग्य आहे. जान्हवीचा हा पहिलाच चित्रपट आहे आणि प्रत्येक कलाकाराची एक वेगळी छाप असते,’ असे फराहने म्हटले.

वाचा : इरफानच्या प्रकृतीविषयी सूजित म्हणतोय..

‘धडक’ हा सुपरहिट मराठी चित्रपट ‘सैराट’चा हिंदी रिमेक आहे. यामध्ये जान्हवीसोबत शाहिद कपूरचा भाऊ इशार खत्तर मुख्य भूमिकेत आहे. त्यातील गाजलेल्या ‘झिंगाट’ या गाण्याचे रिक्रिएटेड व्हर्जनसुद्धा यामध्ये पाहायला मिळणार असून त्याची कोरिओग्राफी फराहने केली आहे.

First Published on March 13, 2018 2:32 pm

Web Title: unfair to compare sridevi and jahnvi says farah khan