News Flash

‘प्रियकर असेल तर श्रीमंतच हवा’; रिलेशनशिपबद्दल अभिनेत्रीचं वक्तव्य

'गरीब बॉयफ्रेंड मला नकोच'; 'या' अभिनेत्रीला करायचंय श्रीमंत तरुणासोबत लग्न

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. आपल्या मादक फोटो आणि व्हिडीओजमुळे ती नेहमीच चर्चेत असते. मात्र यावेळी ती कुठल्याही पोस्टमुळे नव्हे तर आपल्या ड्रीम बॉयफ्रेंडमुळे चर्चेत आहे. बॉलिवूडमधील अनेक कलाकार गेल्या काही काळात लग्न बंधनात अडकले. या पार्श्वभूमीवर उर्वशी कधी लग्न करणार? हा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे. तिने देखील एक चकित करणार उत्तर देत चाहत्यांची उत्सुकता आणखी ताणली आहे.

अवश्य पाहा – होऊ दे खर्च! १० मिनिटांच्या शॉर्ट फिल्मसाठी अभिनेत्रीने घातला ३७ कोटींचा ड्रेस

उर्वशीने टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत आपल्या लग्नावर भाष्य केलं. ती म्हणाली, “प्रेम या संकल्पनेवर माझा खुप विश्वास आहे. लवकरच माझा ड्रीमबॉय माझ्या समोर येईल अशी मला खात्री आहे. यापूर्वी मी एका तरुणासोबत रिलेशनशिपमध्ये होती. काही कारणांमुळे आमचं नात दिर्घ काळ टिकलं नाही. पण त्याने मला एखाद्या राजकुमारीसारखी वागणूक दिली होती. माझ्या सर्व इच्छा तो पूर्ण करायचा. मला अशाच एखाद्या श्रीमंत तरुणासोबत लग्न करायचं आहे. त्या व्यक्तीची मी वाट बघतेय. तो श्रीमंत व्यक्ती समोर येताच मी त्याच्यासोबत लग्न करेन.”

अवश्य पाहा – करोनामुळे वडिलांचं निधन; आठवड्याभरातच ‘या’ अभिनेत्रीनं केलं ग्लॅमरस फोटोशूट

 

View this post on Instagram

 

Protect your piece of mind . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . #love #UrvashiRautela

A post shared by URVASHI RAUTELA Actor (@urvashirautela) on

यापूर्वी उर्वशी क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि संगीतकार गुरु रंधावासोबत रिलेशनशिपमध्ये होती अशा चर्चा होत्या. तिचे या दोघांसोबतचे फोटो अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. परंतु तिने या सेलिब्रिटींसोबत असलेल्या नात्याबाबत कधीही खुलासा केला नाही. शिवाय स्वत:च्या एक्स बॉयफ्रेंडचं नावही कधी सांगितलेलं नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 5, 2020 4:16 pm

Web Title: urvashi rautela want rich boyfriend mppg 94
Next Stories
1 इब्राहिम कलाविश्वात येणार? सैफ म्हणतो…
2 आयुषमानचा हा व्हिडीओ पाहून हसू आवरणार नाही, कॉपी केली शाहरुखची पोज
3 ‘विराट वडिलांच्या निधनानंतर खेळू शकतो, मग मी का नाही?’; ट्रोलर्सवर अभिनेत्री संतापली
Just Now!
X