News Flash

वहिनीसाहेब यांचा दरारा आता झी युवावर!  

जाणून घ्या किती वाजता

प्रेक्षकांची अतिशय आवडती मालिका ‘वहिनीसाहेब’ आता लवकरच ‘झी युवा’ या वाहिनीवर पुन्हा एकदा पहायला मिळणार आहे. शरद पोंगसे, सुचित्रा बांदेकर आणि भार्गवी चिरमुले सारख्या अतिशय तगड्या कलाकरांची जमलेली भट्टी पाहण्याची सुवर्णसंधी झी युवामुळे महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना मिळणार आहे.

घराला घरपण देणारी असते ती त्या घरातील स्त्री, आई, मुलगी, बहिण, सुन. वेगवेगळ्या भूमिकेतून ती घर सजवत असते. घरातील आई ही एके काळची सुन असते. अनेक वेळा केवळ घराची घडी व्यवस्थित बसण्यासाठी समोर येणाऱ्या संकटांशी, नियतीच्या लहरींशी टक्कर देऊन घरी येणारी ही सून ‘वहिनीसाहेब’बनून डोंगराएवढी मोठी होत जाते. यावरुन ज्यांनी वहिनीसाहेब मालिका पाहिली नसेल त्यांना मालिकेची व्याप्ती आणि मुख्य म्हणजे विषय समजला असेल.

वहिनी साहेब ही मालिका म्हणजे महाराष्ट्रातील प्रत्येक घरातील सुनेची कथा आहे. या मालिकेच्या पुनः प्रक्षेपणाद्वारे झी युवा ही वाहिनी महाराष्ट्राच्या प्रत्येक घरातील वहिनी साहेब यांना मानाचा मुजरा करत आहे. ही मालिका २७ जुलै पासून सोमवार ते शनिवार संध्याकाळी ४ ते ६ दोन तास दाखवण्यात येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 27, 2020 3:20 pm

Web Title: vahini saheb serial will telecast on zee yuva avb 95
Next Stories
1 सुशांत आत्महत्या प्रकरण : महेश भट्ट यांची पोलिसांकडून चौकशी
2 सुशांत आत्महत्या प्रकरण: करणवर आरोप करताना कंगनाने आदित्य ठाकरेंचाही केला उल्लेख
3 ऑस्कर मिळाल्यानंतर हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये मला कोणी काम दिले नाही- रेसुल पूकुट्टी
Just Now!
X