News Flash

‘स्त्री’च्या सीक्वलमध्ये भूमिका साकारण्याच्या चर्चांवर वरुण म्हणतो..

२०१८ मध्ये आलेल्या 'स्त्री'ने बॉक्स ऑफिसवर १०० कोटींचा टप्पा पार केला आहे

‘स्त्री’च्या सीक्वलमध्ये भूमिका साकारण्याच्या चर्चांवर वरुण म्हणतो..
वरुण धवन

गेल्या वर्षी २०१८मध्ये राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर यांची मुख्य भूमिका असलेला ‘स्त्री’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली होती. चित्रपटाच्या याच लोकप्रियतेमुळे लवकरच त्याचा दुसरा भाग ‘स्त्री २’ देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून ‘स्त्री’च्या दुसऱ्या पार्टमध्ये राजकुमार रावऐवजी वरुण धवन झळकणार असल्याची चर्चा सुरु आहे. मात्र या चर्चांना वरुणने पूर्णविराम दिला असून त्याने या चित्रपटाचा भाग नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

वरुण सध्या त्याच्या आगामी ‘कलंक’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. ‘कलंक’मध्ये तगडी स्टारकास्ट झळकणार असून या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन सुरु आहे. याचदरम्यान, त्याने ‘स्त्री २’ विषयी त्याचं मत मांडल्याचं पाहायला मिळालं. विशेष म्हणजे “मी ‘स्त्री २’ मध्ये झळकणार हे मला आताच समजतंय”, असं वरुणने सांगितलं.

“गेल्या काही दिवसांपासून ‘स्त्री २’ मध्ये मी झळकणार असल्याच्या चर्चा सुरु असल्याचं  माझ्या कानावर आलं आहे. मात्र प्रत्यक्षात हे सत्य नाही. मी ‘स्त्री २’ मध्ये काम करणार नाहीये. त्यामुळे या चर्चांकडे दुर्लक्ष करा. या निव्वळ अफवा आहेत”, असं वरुण यावेळी म्हणाला.

दरम्यान, यावेळी त्याने नताशासोबत लग्न करण्याविषयीही त्याचं मत स्पष्ट केलं. “नताशा आणि मी लग्न करणार आहोत. पण सध्या ही योग्य वेळ नाही. ज्यावेळी योग्य वेळ येईल तेव्हा आम्ही लग्न करु”, असंही तो म्हणाला. सध्या वरुण त्याच्या ‘कलंक’ चित्रपटामध्ये व्यस्त आहे. या चित्रपटामध्ये तगडी स्टारकास्ट झळकणार असून हा चित्रपट १७ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यासोबतच तो ‘स्ट्रीट डान्सर’ या चित्रपटामध्येही श्रद्धा कपूरसोबत मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

राजकुमार रावने अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकली आहे. मात्र गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या स्त्रीमुळे त्याच्या लोकप्रियतेत कमालीची वाढ झाली. स्त्रीने बॉक्स ऑफिसवर १०० कोटी रुपयांचा टप्पा पार केला होता. या चित्रपटाच्या यशानंतर त्यांच्याकडे आणखी तीन चित्रपटांच्या ऑफर्स आल्या. त्यामुळे राजकुमार लवकरच ‘मेंटल है क्या’, ‘मेड इन चायना’ आणि ‘तुर्रम खान’ या चित्रपटांमध्ये झळकणार आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 8, 2019 11:58 am

Web Title: varun dhawan denies rumours replacing rajkummar rao stree 2
Next Stories
1 ..तर ‘धडकन’चा क्लायमॅक्स असता वेगळा; १९ वर्षांनंतर शिल्पा शेट्टीनं केला खुलासा
2 ‘अंधाधून’ चिनी प्रेक्षकांनाही भावला, पहिल्याच आठवड्यात घसघशीत कमाई
3 ‘सिटी ऑफ ड्रीम्स’मधून प्रियाचं डिजिटल क्षेत्रात पदार्पण