News Flash

नताशा-वरुणच्या लग्नाचे बच्चन कुटुंबीयांना नाही आमंत्रण, गोविंदाचेही यादीमध्ये नाव नाही?

२४ जानेवारी रोजी नताशा आणि वरुण लग्न करणार आहेत.

बॉलिवूड अभिनेता वरुण धवन आणि त्याची गर्लफ्रेंड नताशा दलाल यांच्या लग्नाची जोरदार तयारी सुरु आहे. त्यांच्या लग्नाच्या विधींना सुरुवात झाली आहे. आज संगीत सेरेमनी असून उद्या २४ जानेवारी रोजी त्यांचा लग्नसोहळा पार पडणार आहे. वरुण आणि नताशाने लग्नासाठी अलिबाग हे ठिकाण निवडले आहे. पण त्यांच्या लग्नाचे बच्चन कुटुंबीय आणि अभिनेता गोविंदाला आमंत्रण नसल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

करोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे वरुण आणि नताशाच्या लग्नाला केवळ ५० पाहुण्यांना आमंत्रण देण्यात आले आहे. या ५० पाहुण्यांच्या यादीमध्ये नताशा आणि वरुणच्या कुटुंबीयांना, जवळचा मित्रपरिवार आणि इंडस्ट्रीमधील काही मोजक्याच लोकांचा समावेश आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by VarunDhawan (@varundvn)

नताशा आणि वरुणच्या लग्नातील पाहुण्यांच्या यादीमध्ये सलमान खान, शाहरुख खान, सिद्धार्थ मल्होत्रा आणि अर्जुन कपूर यांचा समावेश असल्याचे म्हटले जाते. पण या यादीमध्ये बच्चन कुटुंबीय आणि अभिनेता गोविंदाचे नाव नसल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by VarunDhawan (@varundvn)

गोविंदा आणि वरुण धवनचे वडील डेविड धवन यांनी जवळपास २८ चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. त्यावेळी त्यांची जोडी हिट होती. पण गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यामध्ये वाद सुरु असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. वरुण धवनने अनिल कपूर, बोनी कपूर आणि त्यांच्या मुलांना देखील आमंत्रण दिले नसल्याचे म्हटले जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2021 7:13 pm

Web Title: varun dhawan natasha dalal wedding amitabh bachchan and govinda not invited avb 95
Next Stories
1 ‘बच्चन पांडे’मधील अक्षय कुमारचा लूक ठरतोय चर्चेचा विषय
2 रोहित शेट्टीने हाताने उचलली कार, व्हिडीओ व्हायरल
3  मेघना-आदित्यचा साखरपुडा मोडणार? ‘माझा होशील ना’मध्ये नवा ट्विस्ट
Just Now!
X