25 February 2021

News Flash

स्ट्रीट डान्सर 3D : ‘या’ टिकटॉक स्टारवरुन तयार झाला वरुणचा लूक

तरुणाईमध्ये टिकटॉकची क्रेझ असल्याचं पाहायला मिळत

वरुण धवन

चित्रपट दिग्दर्शक रेमो डिसुझा याने डान्सवर आधारित ‘एबीसीडी’, ‘एबीसीडी २’ हे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणले. उत्तम कथानक असल्यामुळे ते बॉक्स ऑफिसवर गाजलेदेखील. त्यानंतर या त्याचा तिसरा भाग ‘स्ट्रीट डान्सर 3D’ हा चित्रपट येत आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता वरुण धवन आणि श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर वरुणच्या लूकची जोरदार चर्चा सुरु झाली. त्याचा हा लूक नेमका कुठून आला हा प्रश्न चाहत्यांना पडला होता. मात्र वरुणने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत या लूकमागची प्रेरणा कुठून घेतली आहे हे सांगितलं.

सध्या तरुणाईमध्ये टिकटॉकची क्रेझ असल्याचं पाहायला मिळत आहे. अनेक जण टिकटॉकच्या माध्यमातून विविध गाण्यांवर त्याचे व्हिडीओ करत असतात. यात काही टिकटॉक स्टारदेखील झाले आहेत. त्यांची लोकप्रियतादेखील कोणत्या सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही. अशाच एका टिकटॉक स्टारवरुन वरुणचा लूक करण्यात आला आहे.


दिवंगत टिकटॉक स्टार दानिश याच्या लूकवरुन वरुणचा लूक तयार करण्यात आला आहे. वरुणने इन्स्टावर एक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली. सोबत दानिशचा एक फोटोही त्याने शेअर केला. या पोस्टमध्ये वरुणने त्याचा स्टाइलिस्ट आलिम हकीमलादेखील टॅग केलं आहें.

‘स्ट्रीट डान्सर 3D’मध्ये साहेजचा लूक दानिशच्या लूकवरुन करण्यात आला आहे. आज दानिश आपल्यात नाहीये. पण त्याच्यावर प्रेम करणारे अनेक लोक आहेत. त्यानेच आम्हाला साहेजच्या लूकसाठी प्रेरित केलं. दिग्दर्शक रेमो डिसूझा यांनी हा लूक करण्याचा सल्ला आम्हाला दिला आणि आलिम हकीम भाईने हा लूक परफेक्ट तयार केलं, असं कॅप्शन वरुणने दिलं आहे.

रेमो डिसुझा दिग्दर्शित ‘स्ट्रीट डान्सर 3D’ हा चित्रपट २४ जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात श्रद्धा कपूर, प्रभूदेवा आणि नोरा फतेही महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 4, 2020 9:29 am

Web Title: varun dhawan street dancer 3d look inspired by youtuber danish ssj 93
Next Stories
1 सत्तासंघर्षांचा धुरळा
2 Dhurala Movie Review: ‘खुर्ची’ला खिळवून ठेवणारा ‘धुरळा’
3 मराठी रंगभूमीच्या गौरवशाली इतिहासाचे तीन खंड प्रकाशित होणार
Just Now!
X