27 September 2020

News Flash

नव्या इनिंगच्या तयारीत वरुण

वरुण त्याचं स्वत:चं प्रोडक्शन हाऊस लॉन्च करणार आहे.

वरुण धवन

‘स्टुडंट ऑफ दि इअर’ या चित्रपटातून चंदेरी दुनियेत पदार्पण केलेल्या वरुण धवनचं नाव सर्वाधिक लोकप्रिय होणाऱ्या कलाकारांच्या यादीत घेतलं जातं. वरुणने त्याच्या अभिनयाच्या जोरावर प्रत्येक प्रेक्षकाच्या मनात स्वत: स्थान निर्माण केलं आहे. विशेष म्हणजे उत्तम अभिनय करणारा हा कलाकार आता निर्मिती क्षेत्राकडे वळणार असल्याचं पाहायला मिळत आहे.

वरुणचे वडील डेव्हिड धवन यांनी आतापर्यंत अनेक चित्रपटांची निर्मिती केली असून ‘मैं तेरा हीरो’ आणि ‘जुडवा २’ या चित्रपटांमध्ये वरुणने आपल्या वडीलांना सहकार्य केलं होतं. मात्र आता वरुण त्याचं स्वत:चं प्रोडक्शन हाऊस लॉन्च करणार आहे. यावेळी वरुणला मोठा भाऊ, वडील डेव्हिड धवन आणि चित्रपट निर्माता रोहित यांची साथ मिळणार आहे.

‘फिल्मफेअर’नुसार, सध्या फक्त या नव्या प्रोडक्शन हाऊसविषयी चर्चा सुरु असून २०१९ पर्यंत या प्रोडक्शन हाऊसचं लॉन्चिंग करण्यात येणार आहे. मात्र याविषयी वरुणने अद्याप काही स्पष्ट केलं नसून लवकरच त्याची अधिकृत घोषणा करण्यात येईल.

दरम्यान, वरुण सध्या अभिषेक वर्माच्या ‘कलंक’च्या चित्रीकरणामध्ये व्यस्त असून या चित्रपटामध्ये त्याच्याबरोबर आलिया भट्ट, माधुरी दीक्षित, संजय दत्त सोनाक्षी सिन्हा आणि आदित्य रॉय कपूर स्क्रिन शेअर करणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 7, 2018 4:08 pm

Web Title: varun dhawan to launch their own production house
Next Stories
1 #LailaMajnu : ‘या’ कारणांसाठी लैला-मजनू एकदा पाहाच
2 निर्मल सोनी नवे ‘डॉ. हाथी’!
3 अभय -दिप्ती ठरले संजय जाधवसाठी ‘लकी’
Just Now!
X