‘मसान’पासून ते अलीकडच्या ‘राजी’, ‘संजू’ आणि ‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’पर्यंत वेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारण्यास अभिनेता विकी कौशलने प्राधान्य दिलं आहे. आगामी ‘भूत पार्ट वन – द हाँटेड शीप’ या चित्रपटाच्या माध्यमातून तो आणखी एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. भानू प्रताप सिंग दिग्दर्शित हा एक भयपट आहे. या भयपटातील विकीचा फर्स्ट लूक नुकताच समोर आला आहे.
करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शन अंतर्गत ‘भूत’ चित्रपटाची निर्मिती होणार आहे. ‘भूत’ चित्रपटाचे अनेक भाग येणार आहेत. यातला पहिला भाग ‘भूत- द हाँटेड शिप’ १५ नोव्हेंबर २०१९ मध्ये प्रदर्शित होणार आहे. आतापर्यंत करणच्या धर्मा प्रोडक्शननं अनेक रोमँटीक चित्रपटांची निर्मिती केली आहे मात्र पहिल्यांदाच धर्मा प्रोडक्शन भयपट आणणार आहे.
Vicky Kaushal… First look poster of #Bhoot: Part One – The Haunted Ship… Directed by Bhanu Pratap Singh… 15 Nov 2019 release. pic.twitter.com/dkrn0BHrXB
— taran adarsh (@taran_adarsh) June 10, 2019
या चित्रपटात विकी सोबतच भूमी पेडणेकर प्रमुख भूमिकेत आहे. एका सत्य घटनेवर आधारित या चित्रपटाची कथा असल्याचं निर्माता शशांक खैताननं याआधी एका मुलाखतीत सांगितलं होतं. चित्रपटाची शूटिंग पूर्ण झाली असून पोस्ट-प्रॉडक्शनचं काम सध्या सुरू आहे. गुजरातमध्ये याच चित्रपटाची शूटिंग सुरू असताना विकीला दुखापत झाली होती. त्याच्य गालाच्या हाडाला १३ टाके पडले होते.