भारताचे आठवे लष्करप्रमुख सॅम माणेकशॉ यांच्या जीवनावर आधारित ‘सॅम’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अभिनेता विकी कौशल मुख्य भूमिका साकारत असून त्याचा नवा लूक नुकताच प्रदर्शित झाला आहे. विकीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत हा लूक चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

विकीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये माणेकशॉ यांची एक लहानशी झलक दाखविण्यात आली असून व्हिडीओच्या शेवटी विकी माणेकशॉ यांच्या रुपात दिसून येत आहे. यात त्याने माणेकशॉ यांच्याप्रमाणे पोशाख परिधान केला आहे. विशेष म्हणजे माणेकशॉ यांच्या पुण्यतिथीच्या दिवशीच विकीचा हा लूक समोर आला आहे. ‘राजी’ फेम दिग्दर्शिका मेघना गुलजार माणेकशॉ यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विकीचा हा नवा लूक सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. भारतीय लष्कराचा पोशाख, तोंडावरील स्मितहास्य, मिशा अशा लूकमध्ये विकी दिसून येत आहे. २०२१ मध्ये या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. चित्रपटातील काही भागामध्ये १९७१ सालच्या युद्धाचा काळ दर्शविला जाणार आहे.