‘मसान’,‘उरी : द सर्जिकल स्टाइक’ या चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळी छाप उमटविणारा अभिनेता म्हणजे विकी कौशल. उत्तम अभिनय कौशल्य आणि व्यक्तीमत्त्व यांच्या जोरावर विकीने कलाविश्वात स्वत:चं अढळ स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळे आज त्याचा असंख्य मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी विकी कायम सोशल मीडियावर सक्रिय असतो आणि त्याच्याविषयीचे अपडेटस देत असतो. यातच आता मध्यरात्री विकीने एक पोस्ट शेअर केली असून ती चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.
विकीने रात्री पावणेतीनच्या सुमारास इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये विकीने त्याचा शर्टलेस फोटो शेअर केला असून त्याला भन्नाट कॅप्शन दिली आहे. या कॅप्शनमध्ये त्याने ‘बारीक व्हायचंय’,असं म्हटलं आहे.
या फोटोवर चाहत्यांप्रमाणेच अनेक सेलिब्रिटींनी कमेंट्स केल्या आहेत. ‘कॅप्शन गेम’ असं कुणाल खेमूने म्हटलं आहे. तर ‘वाहा’ असं भूमि पेडणेकरने म्हटलं आहे.
दरम्यान, या फोटोसोबतच विकीच्या आगामी चित्रपटाची चर्चादेखील रंगली आहे. विकी लवकरच ‘भूत पार्ट वन : द हॉण्टेड शीप’ या चित्रपटात झळकणार आहे. त्याचबरोबर तो शूजित सरकार यांच्या सरदार उधम सिंह या चित्रपटातही मुख्य भूमिकेत दिसणार आहे.