कठुआ आणि उन्नावसारख्या घटना भारतात वाढतानाच दिसत आहेत. सामान्य जनता प्रशासनाकडे आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा व्हावी याची मागणी करत असताना आता बॉलिवूडचे सुपरस्टारही पीडितांना न्याय मिळावा यासाठी रस्त्यावर उतरले. आतापर्यंत सेलिब्रिटी फक्त सोशल मीडियावरूनच विरोध करताना दिसत होते. पण आता त्यांनीही रस्त्यावर येऊन आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. ८ वर्षांच्या मुलीवर सामुहिक बलात्कार झाल्याचे कळताच प्रत्येक जनतेच्या मनात एक चीड आहे. सेलिब्रिटींनीही सोशल मीडियावर नराधमांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी यासाठी मोहीम राबवली होती.

अभिनेत्री कल्कि कोचलिन, सोनाली बेंद्रे, सोनम कपूर, सिमी ग्रेवाल आणि करीना कपूर जैसी शख्सियतों ने ‘हां मैं हिंदुस्तानी हूं और मैं शर्मिंदा हूं’ या कॅप्शनसह त्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. तर ट्विंकल खन्ना मुलगा आरवसह सामान्य जनतेसोबत मुलींवर झालेल्या अन्यायाच्या विरोधात रस्त्यावर उतरली होती. या मोर्च्यात किरण राव, राजकुमार राव, पत्रलेखा, अदिति राव हैदरी, समीरा रेड्डी, अनुष्का मनचंदा, विशाल ददलानी, सपना भावनानी, तारा शर्मा, विद्या मालवदे, हेलेन, आणि अन्य कलाकारही सहभागी झाले होते.

उन्नाव आणि कठुआसारख्या प्रकरणावर देशभर संताप व्यक्त केला जात आहे. अशा गंभीर गुन्ह्यांसाठी आरोपींना लवकरात लवकर कडक शिक्षा झालीच पाहिजे अशी प्रत्येक नागरिकाची मागणी आहे. कठुआ बलात्कार प्रकरणानंतर अभिनेत्री सिमी गरेवाल यांनी सोशल मीडियावर आपले मत व्यक्त करत म्हटले की, ‘या जगात बलात्कार करणाऱ्यांहून वाईट जात कोणतीच नसेल. अशा लोकांसाठी सर्वोच्च शिक्षाही कमीच पडेल. मला आता फक्त एवढंच विचारायचं आहे की देव कुठे आहे?’

कल्किनेही याच आशेयाचा संदेश लिहित म्हटलं की, ‘मी एक हिंदुस्थानी आहे आणि याची मला लाज वाटते.’ तर अभिनेत्री सोनम कपूरने म्हटले की, ‘मला विश्वास बसत नाही की इतके वाईट कृत्य आपल्या भारतात होत आहे. खोटी देशभक्ती आणि खोटे हिंदुत्त्व दाखवणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे.’