News Flash

VIDEO: भोली सुरत दिल के खोटे .. गाण्यातील विद्या आणि मंगेशची अदा

भगवान दादांच्या अलबेला चित्रपटातील गाणी आजही तितकीच प्रसिद्ध आहेत.

VIDEO: भोली सुरत दिल के खोटे .. गाण्यातील विद्या आणि मंगेशची अदा

‘शोला जो भडके दिल मेरा धडके’ या गाण्याने सर्वांना वेड लावल्यानंतर एक अलबेला चित्रपटातील ‘भोली सुरत दिल के खोटे’ हे गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे. या गाण्यात विद्या बालन आणि मंगेश देसाईची अदाकारी आपल्याला पाहायला मिळते.
भगवान दादांच्या अलबेला चित्रपटातील गाणी आजही तितकीच प्रसिद्ध आहेत. यातलं कोणतही गाणं ऐकू आल तरी लगेच आपले पाय थिरकायला लागतात. त्यामुळे या चित्रपटातील सर्व गाणी एक अलबेलामध्ये पुर्नचित्रित करण्यात आली आहेत. भगवान दादांची भूमिका मंगेशने साकारली असून विद्या यात गीता बालींच्या भूमिकेत दिसते. विशेष म्हणजे या दोघांची करण्यात आलेली रंगभूषा सर्वांचेच विशेष लक्ष वेधून घेतेय. विद्याधर यांनी या दोघांचीही रंगभूषा केली असून मंगेश आणि विद्या हे हुबेहुब भगवान दादा आणि गीता बाली यांच्यासारखेच दिसत आहेत. त्यामुळे या चित्रपटाबाबतची उत्सुकता आणखीनच वाढली आहे.
भगवान दादांवर आधारित असलेला एक अलबेला २४ जूनला सर्वत्र प्रदर्शित होईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 13, 2016 11:30 am

Web Title: video vidya balan and mangesh desai dancing on bholi surat dil ke khote song
टॅग : Vidya Balan
Next Stories
1 ‘उडता पंजाब’ला १३ कट्ससह प्रदर्शनाची सेन्सॉर बोर्डाची परवानगी
2 रितेश-जेनेलियाच्या चिमुकल्याचं बारसं, नाव ठेवलं…
3 अभिनेता कुणाल खेमूवर हल्ला
Just Now!
X