‘नागरिकत्व दुरुस्ती कायदा २०१९’ लागू झाल्यापासून देशभरात निदर्शने सुरू झाली आहे. ईशान्य भारतानंतर राजधानी दिल्लीसह अनेक ठिकाणी आंदोलक रस्त्यांवर उतरले आहेत. देशभरात अनेक ठिकाणी पोलिसांनी आदोलकांची धरपकड केली. या संपूर्ण प्रकरणावर सुपरस्टार रजनीकांत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी आंदोलकांना हिंसेपासून दूर राहाण्याचे आवाहन केले आहे.

‘सोशल मीडियावर नको आता थेट मैदानात भेटा’; फरहान अख्तर उतरणार आंदोलनात

काय म्हणाले रजनीकांत?

“देशात सध्या सुरु असलेल्या हिंसाचाराच्या घटनांमुळे मला खुप दु:ख होत आहे. हिंसाचार करुन कुठल्याही समस्येवर तोडगा निघू शकत नाही. मी देशातील सर्व नागरिकांना एकत्र राहाण्याची विनंती करतो.” अशा आशयाचे ट्विट करुन रजनीकांत यांनी आंदोलनकर्त्यांना शांततेच्या मार्गाने आपली मते मांडण्याची विनंती केली आहे.

आपण हिंदू आहोत का? मुलाच्या प्रश्नाने ‘हा’ चित्रपट निर्माता हैराण

नागरिकत्व कायदा : “मुस्लिम, ख्रिश्चन नंतर महिलांकडे… ते नेहमीच विभाजनाचा मार्ग शोधतात”

मुँह में दही काहे जमा है रे?; ‘आर्टिकल १५’च्या दिग्दर्शकाचा सेलिब्रिटींना सवाल

यापूर्वी फरहान अख्तर, सिद्धार्थ, अनुभव सिन्हा, विकी कौशल, पूजा भट्ट, आलिया भट्ट, परिणीती चोप्रा, रेणूका शहाणे, जावेद जाफरी, हूमा खुरेशी, स्वरा भास्कर यांसारख्या अनेक सिनेकलाकारांनी ट्विट करुन ‘नागरिकत्व दुरुस्ती कायदा २०१९’ बाबत आपल्या प्रतिक्रिया दिल्या.