News Flash

पापा ऑन ड्यूटी; विरुष्काचे एअरपोर्टवरील फोटो व्हायरल

वामिकासोबत विरुष्का अहमदाबादहून परतले.

आई झाल्यापासूनच अभिनेत्री अनुष्का शर्मा मुलगी वामिकासोबत वेळ घालवताना दिसतेय. विरुष्काने त्यांच्या लेकीला मीडियापासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ते पूर्ण प्रयत्नदेखील करताना दिसत आहेत. त्याचसोबत चांगले पालक बनण्याचा त्यांचा पुरेपूर प्रयत्न सुरु आहे.

नुकतच विराट कोहली आणि अनुष्का शर्माला वामिकासोबत एअरपोर्टवर स्पॉट करण्यात आलंय. विरुष्काचे बाळासोबतचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. या फोटोत अनुष्काने वामिकाल उचलून घेतल्याचं दिसतंय. तर विराट कोहली सर्व बॅगस् सांभाळत आहे. तर या फोटोंमुळे विरुष्काचं कौतुकही होतंय. दोघही चांगलं पालकत्व करत असल्याचं म्हंटलं जातंय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

एअरपोर्ट वरील फोटोमध्ये अनुष्काने वामिकाला जवळ कवटाळून पकडल्याचं दिसतंय. त्यामुळे विरुष्काने ठरवल्याप्रमाणे कोणत्याच फोटोत वामिकाचा चेहरा दिसत नाहिय. तर विराटने सर्व बॅगस् सांभाळत एक उत्तम वडील होण्याचं कर्तव्य पार पाडलंय असं नेटकऱ्यांकडून म्हंटलं जातंय. इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सामन्यासाठी अनुष्का विराट कोहलीसोबत अहमदाबादला गेली होती. अहमदाबादवरुन पुण्याला परतत असताना विरुष्काच्या कुटुंबाला एअरपोर्टवर स्पॉट करण्यात आलं. सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भय्यानी तसचं काही इतर काही मीडिया फोटोग्राफर्सनी विरुष्काचे फोटो त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.

12 जानेवारीला विरुष्काच्या घरात वामिकाचं आगमन झालं. दोघांनी वामिकाचा 2 महिने पूर्ण केल्यानिमित्ताने वाढदिवसही साजरा केला. तर नुकताच विरुष्काने एक फोटो शेअर केला होता. ज्यात घराच्या दारावरील पट्टीत वामिकाच्या नावाचा त्यांनी समावेश केल्याचं सांगितलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 22, 2021 8:57 am

Web Title: virat kohali anushka sharma spotted airport with baby vamika photos viral anushka holds babay and virat holds bags kpw 89
Next Stories
1 ‘या’ कार्यासाठी आमिरच्या लेकीला गरज आहे २५ लोकांची, महिन्याला मिळणार पगार
2 ‘रिप्ड शर्टबद्दल कुणाला चिंता आहे का’?, अदनान सामीची मजेशीर पोस्ट व्हायरल
3 कसा शूट झाला अंजी पश्याचा स्विमिंग पूल सीन; संपूर्ण टीमची पूलमध्ये धमाल
Just Now!
X