News Flash

विरुष्काची एकूण संपत्ती माहिती आहे का?

त्यांची वर्षाची कमाई ऐकून तुम्ही चक्रावून जाल

भारताचा कर्णधार विराट कोहली हा आपल्या कामगिरीमुळे सातत्याने चर्चेत असतो. अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी त्याला सर्वोत्तम फलंदाज म्हणून पावती दिली आहे. तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या जागतिक क्रमवारीतही त्याने अव्वल स्थान कायम राखत स्वत:ला सिद्ध केले आहे. विराटने अभिनेत्री अनुष्का शर्माशी लग्न केले. त्यानंतर या जोडीच्या चर्चा आणखीच सुरु झाल्या. या लव्हबर्ड्स बद्दल जाणून घेण्यासाठी चाहते फार उत्सुक असतात. आज विराट-अनुष्काचे नाव देशातील सर्वात श्रीमंत सेलिब्रिटींच्या यादीमध्ये घेतले जाते. या दोघांची एकूण कमाई ऐकून तुम्हीही थक्क व्हाल.

फोर्ब्सने २०१९मध्ये जाहिर केलेल्या सेलिब्रिटींच्या यादीमध्ये विराट पहिल्या क्रमांकावर होता. त्याने गेल्या वर्षी २५२.७२ कोटी रुपयांची कमाई केली होती. तर अनुष्का याच यादीमध्ये २१व्या क्रमांकावर होती. तिने वर्षभरात २८.६७ कोटी रुपयांची कमाई केली होती. विराटकडे एकूण ९०० कोटींची संपत्ती असल्याचे म्हटले जाते. तसेच अनुष्काकडे ३५० कोटींची संपत्ती असल्याच्या चर्चा सुरु आहेत. या दोघांकडे मिळून जवळपास १२०० कोटींहून अधिक संपत्ती आहे.

आणखी वाचा : होऊ दे खर्च : विराट अनुष्कानं लग्नासाठी केलेल्या खर्चाचा आकडा माहिती आहे का?

आंतराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांतून मिळणाऱ्या मानधनाशिवाय जाहिरातींमधून मिळणारे मानधन आणि आयपीएलमधून मिळणार पैसे हे विराटच्या कमाईचे स्त्रोत आहेत. तर दुसरीकडे अनुष्का बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांमध्ये मुख्य भूमिकेत काम करते. शिवाय ती अनेक जाहिरातींमध्ये देखील काम करते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 12, 2020 11:02 am

Web Title: virat kohli and anushka total property avb 95
Next Stories
1 Video : सेल्फी घेणाऱ्या चाहतीवर भडकली करीना; म्हणाली…
2 हॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्याला करोनाचा संसर्ग; ट्विट करून दिली माहिती
3 अभिनेत्रीनं चार वर्षात घेतला दुसऱ्यांदा घटस्फोट
Just Now!
X