22 October 2020

News Flash

फार्महाऊसवर स्टारने सुशांतचे करिअर संपवायची दिली होती धमकी, दिग्दर्शकाचा खुलासा

दिग्दर्शकाचे हे ट्विट सध्या चर्चेत आहे.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने १४ जून रोजी आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही. सध्या या प्रकरणी सीबीआय चौकशी सुरु आहे. तसेच बॉलिवूडमधील अनेक कलाकार सोशल मीडियाद्वारे या प्रकरणी त्यांचे मत व्यक्त करत आहेत. नुकताच दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी केलेले ट्विट चर्चेत आहे.

विवेक यांनी ट्विट करत सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी मत व्यक्त केले आहे. पण त्यांनी ट्विटमध्ये सुशांतचे फार्महाऊसवर एकदा एका स्टारसोबत भांडण झाले होते असे म्हटले आहे. हे भांडण कधी झाले होते याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. पण विवेक यांनी केलेले ट्विट सध्या चर्चेत आहे.

‘एकदा फार्म हाऊसवर एसएसआर (सुशांत सिंह राजपूत)चे एका स्टारसोबत भांडणं झालं होते. त्या भांडणाला स्टारने सुरुवात केली होती. त्या स्टारचा रागाच्या भरात स्वत: वरचा ताबा सुटला होता आणि त्याने एसएसआरला त्याचे संपूर्ण करिअर संपवून टाकेन अशी धमकी दिली होती. जसं त्याने इतरांसोबत केले. रिया ही एक मोहरा आहे. मुंबई पोलिस आणि महाराष्ट्र सरकार मोठ्या लोकांना पाठिशी घात आहे’ या आशयाचे ट्विट विवेक अग्निहोत्रीने केले आहे.

१४ जून रोजी सुशांतने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. काहींनी सुशांतने घराणेशाहीला कंटाळून आत्महत्या केली असे म्हटले आहे तर काहींनी नैराश्यामध्ये हे पाऊल उचलले असल्याचे म्हटले होता. पण अद्याप सुशांतच्या आत्महत्येचे कारण समोर आलेले नाही. सीबीआय या प्रकरणी चौकशी करत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 30, 2020 2:21 pm

Web Title: vivek agnihotri tweet on ssr threaten by star avb 95
Next Stories
1 अभिनेत्रीने सुनील ग्रोवरसोबत काम करण्यास दिला नकार; निर्मात्यांवर केला फसवणूकीचा आरोप
2 Video : ऐश्वर्या रायचा डान्स करतानाचा व्हिडीओ व्हायरल
3 “मला ग्लॅमरस म्हणू नका मी टॉमबॉय आहे”; ‘मोस्ट डिजायरेबल वुमन’ची चाहत्यांना विनंती
Just Now!
X