26 September 2020

News Flash

विवेक ओबेरॉयला भारताच्या पराभवानंतर मीम शेअर करणं पडलं महागात

'स्वत:चं करिअर घडवताना तुझ्यासोबत सुद्धा हेच घडलं असावं,' अशा शब्दांत एका युजरने त्याला सुनावलं.

विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यफेरीत न्यूझीलंडने भारताला १८ धावांनी पराभूत केले. या पराजयासह भारताचे तिसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न धूळीस मिळाले. या सामन्यानंतर सर्वच स्तरांतून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. भारताच्या पराभवानंतर अभिनेता विवेक ओबेरॉयने ट्विटर अकाऊंटवर एक GIF पोस्ट केलं आणि हे ट्विट त्याला चांगलंच महागात पडलं आहे.

या GIF व्हिडीओमध्ये रस्त्यावरील एक तरुणी मिठी मारण्यासाठी आपल्याजवळ येतेय असा विचार एक व्यक्ती करत असतो. मात्र ती त्याच्याकडे न जाता बाजूने चालणाऱ्या दुसऱ्याच व्यक्तीला मिठी मारते. ‘विश्वचषकाच्या उपांत्यफेरीत भारतीय चाहत्यांसोबत हेच झालं,’ असं कॅप्शन देत विवेकने तो व्हिडीओ शेअर केला. मात्र विवेकचा हा विनोद नेटकऱ्यांना काही पसंत पडला नाही.

‘स्वत:चं करिअर घडवताना तुझ्यासोबत सुद्धा हेच घडलं असावं,’ अशा शब्दांत एका युजरने त्याला सुनावलं. तर काहींनी भारतीय क्रिकेट संघाचा आदर करण्याचा सल्ला विवेकला दिला.

याआधी विवेकने निवडणुकांच्या एक्झिट पोलसंदर्भातलं एक मीम शेअर केलं होतं. तेव्हासुद्धा मोठा वाद निर्माण झाला होता. त्या मीमविरोधात त्याला राज्य महिला आयोगाने नोटीस बजावली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 13, 2019 8:00 am

Web Title: vivek oberoi posts nasty meme on india world cup exit here is what internet says ssv 92
Next Stories
1 टीम इंडियाच्या पराभवाबाबत विवेक ओबेरॉयने शेअर केलं GIF, चाहत्यांनी झापले
2 चित्र रंजन : वास्तवाची नाटय़मय मांडणी
3 शाळेत दोनदा नापास झालेला ‘बंटी’; ‘सेक्रेड गेम्स’मुळे बदललं नशीब
Just Now!
X