22 September 2020

News Flash

अभिनयानंतर विवेक ओबेरॉयची निर्मिती क्षेत्राकडे वाटचाल; ‘या’ चित्रपटापासून करणार श्रीगणेशा!

विवेक ओबेरॉयचं निर्मिती क्षेत्रात पदार्पण

बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय हे नाव साऱ्यांनाच ठावूक असेल. विवेकने बॉलिवूडमध्ये काही मोजक्याच भूमिक केल्या. मात्र २०१९ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित चित्रपट केल्यामुळे विवेक चर्चेत आला. या चित्रपटामुळे अनेक वाद निर्माण झाले होते. त्यानंतर आता विवेकने निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलं आहे.

विवेकने त्याच्या इन्स्टाग्रामवर या आगामी चित्रपटाचं पहिलं पोस्टर शेअर केलं असून तो या चित्रपटाच्या माध्यमातून निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत असल्याचं सांगितलं आहे. विशेष म्हणजे हा मर्डर मिस्ट्री चित्रपट असल्याचं म्हटलं जात आहे.

”इति: कॅन यू सॉल्व्ह युआर ऑन मर्डर’ असं या चित्रपटाचं नाव आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन विशाल मिश्रा करत आहे. ज्यावेळी विशालने मला या चित्रपटाची कथा ऐकवली त्याचवेळी मी या चित्रपटाची निर्मिती करण्याचा निर्धार केला. या चित्रपटाची कथा मला फार आवडली असून ती एका महिलेभोवती फिरत आहे”, असं विवेकने सांगितलं.

दरम्यान, सध्या देशात लॉकडाउन असल्यामुळे या चित्रपटाचं चित्रीकरणही रखडलं आहे. मात्र याच वर्षी सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये चित्रीकरणाला सुरुवात होईल असं सांगण्यात येत आहे. तसंच अद्याप या चित्रपटाशी निगडीत अनेक गोष्टी गुलदस्त्यात आहे. त्यामुळे या चित्रपटात कोणकोणते कलाकार झळकणार हेदेखील स्पष्ट झालेलं नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 1, 2020 2:43 pm

Web Title: vivek oberoi turns producer with thriller film iti ssj 93
Next Stories
1 हिंदुस्तानी भाऊला ISI ने दिली जीवे मारण्याची धमकी; ट्विटरद्वारे धक्कादायक आरोप
2 आमिर खानच्या आईचा करोना रिपोर्ट आला, अभिनेत्यानं टि्वटरवर दिली माहिती
3 सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी संजना सांघीच्या नऊ तासांच्या चौकशीतून समोर आल्या ‘या’ गोष्टी
Just Now!
X